esakal | मंदिरे उघडली, शाळाही उघडणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Citizens are surprised as no one has taken the initiative to open the school

राज्य सरकारने प्रथम कोरोनाला लगाम लावला आणि त्यानंतर सर्वधर्मिय मंदिरे उघडण्यास अनुमती दिली. त्यामुळे सर्वधर्मीय भाविकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मंदिरे उघडली, शाळाही उघडणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (वाशीम) ः राज्य सरकारने प्रथम कोरोनाला लगाम लावला आणि त्यानंतर सर्वधर्मिय मंदिरे उघडण्यास अनुमती दिली. त्यामुळे सर्वधर्मीय भाविकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मंदिरे उघडण्यासाठी देव पाण्यात घालणारे शाळा उघडण्यासाठी मात्र, पुढाकार घेत नसल्याचे बघून जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


राज्य सरकारने फोफावणाऱ्या कोरोना महामारीला लगाम लावल्याशिवाय सर्वधर्मिय मंदीरे न उघडण्याचा निर्णय घेतला होता. संपूर्ण महाराष्ट्रीयन जनता सरकारच्या या निर्णयाच्या पाठीशी उभी राहली. त्यामुळेच राज्य सरकारला कोरोनाला लगाम लावण्यात यश मिळाले आहे.

त्यामुळेच सोमवारपासून (ता.१६) राज्यातील सर्वधर्मिय मंदिरे उघडण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या समंजस निर्णयाचे सर्वधर्मिय भाविकांनी स्वागत केले आहे. १९ मार्चपासून तब्बल २४२ दिवस बंद असलेले स्थानिक जानगिर महाराज संस्थान काल भाऊबीजेच्या पर्वावर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

सोबतच संतनगरी असलेल्या शिरपूर शहरातील मिर्झामियाँ दर्गा, आई भवानी मंदिर, सावतामाळी मंदिर, संत ज्ञानेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर, बेलसरी महादेव मंदिर, विश्वकर्मा मंदिर व इतर मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत.


अडिचशे दिवसांपासून शाळा बंद
सर्वधर्मिय मंदिरे उघडली आहेत परंतु, सुमारे २५० दिवसांपासून शाळा बंद आहेत. मात्र, अँड्राईड मोबाईल, रिचार्ज व नेटवर्क अभावी बाल गोपालांचे शिक्षण बंद असल्यासारखेच आहे. ज्या वयात देशाच्या भावी नागरिकांचा पाया पक्का होऊन देश उभारणीचे कार्य व्हायला हवे, नेमक्या त्याच चिमुकल्यांच्या शिक्षणावर पुढाऱ्यांची दातखिळी बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंदिरे उघडली पण, ज्ञानमंदिरे कधी उघडणार, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

नियमांचे पालन करा
कोरोना महामारीतील मास्क व सॕनिटायजर वापरण्यासंदर्भातील सूचनांचे पालन करून परस्परात पुरेसे अंतर ठेवावे आणि मंदिरात होणारी गर्दी टाळावी, असे स्थानिक जानगिर महाराज संस्थानच्यावतीने भाविकांना आवाहन करण्यात आले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top