थंडी वाढली, रुग्णही घटले, पाच पॉझिटिव्ह, १२ जणांना मिळाली सुटी

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 10 November 2020

थंडीचा जोर वाढेल तसा कोरोना रुग्णांची संख्याही वाढेल ही भिती सध्यातरी दिसून येत नाही. वातावरणातील बदलासोबतच अकोला जिल्ह्यातील कोरोना चाचणी अहवालही घटले असून,त्या प्रमाणातच रुग्ण संख्याही घटली आहे.

अकोला  ः थंडीचा जोर वाढेल तसा कोरोना रुग्णांची संख्याही वाढेल ही भिती सध्यातरी दिसून येत नाही. वातावरणातील बदलासोबतच अकोला जिल्ह्यातील कोरोना चाचणी अहवालही घटले असून,त्या प्रमाणातच रुग्ण संख्याही घटली आहे.

रविवारी एकूण ७८ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून, त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. दिवसभरात १२ जणांना सुटीही देण्यात आली.

अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ८५४६ झाली आहे. हे रुग्ण एकूण ४४ हजार १३५ चाचणी अहवालातून आढळून आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ४२ हजार ९०० तर फेरतपासणीचे २३३ अहवाल आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या १००२ नमुन्यांचाही त्यात समावेश आहे.

रविवारी प्राप्त अहवालांपैकी दिवसभरात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व एक पुरुषांचा समावेश आहे.

त्यातील न्यू बैदपुरा रामदासपेठ, आदलापूर ता. अकोट, कौलखेड, अमणखा प्लॉट व बार्शीटाकली येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शनिवारी रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. दरम्यान, रविवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन जण, ओझोन हॉस्पिटल येथून एक जण, हॉटेल स्कायलार्क येथून दोन जण, अशा एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात सद्यस्थितीत २०१ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Cold has increased, patients have also decreased, five positive, 12 get leave