esakal | नऊ महिन्यांपासून कोरोनाचे थैमान, आज कोरोनाचे ५२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Corona for nine months, today 52 new positive patients of Corona

 कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात ५२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यासह १३ रुग्णांना डिस्चार्च सुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५०१ झाली असून मृतकांची संख्या २८८ झाली आहे.

नऊ महिन्यांपासून कोरोनाचे थैमान, आज कोरोनाचे ५२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात ५२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यासह १३ रुग्णांना डिस्चार्च सुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५०१ झाली असून मृतकांची संख्या २८८ झाली आहे.

गत नऊ महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनाग्रस्तांचा कमी झालेला आलेख आता वाढत जात आहे. दरम्यान रविवारी (ता. २२) कोरोना संसर्ग तपासणीचे १ हजार ४५९ अहवाल प्राप्त झाले.

हेही वाचा -  भाजप म्हणतेय, शाळा बंदच ठेवा; गरिबाच्या मुलांना मोफत स्मार्ट फोन द्या

त्यापैकी ५२ अहवाल पॉझिटिव्ह तर १ हजार ४०७ अहवाल निगेटिव्ह आले. रविवारी सकाळी ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १३ महिला व ३२ पुरुषांचा समावेश आहे.

हेही वाचा - शाळांची घंटी आजपासून वाजणार; पालकांची लेखी संमती आवश्यक

त्यातील मूर्तिजापूर येथील १३ जण, जीएमसी व जुने शहर येथील प्रत्येकी तीन जण, डाबकी रोड, तापडीया नगर, दहातोंडा ता. मूर्तिजापूर, जठारपेठ व एसबीआय कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित भीम नगर, कुंभारी, मोठी उमरी, वाडेगाव ता. बाळापूर, बाळापूर, कान्हेरी गवळी ता. बाळापूर, दीपक चौक, मयूर कॉलनी, मुकुंद नगर, मिलींद नगर, लहान उमरी, तथागत नगर, मलकापूर, तळेगाव ता. तेल्हारा, जूने केतननगर व दानापूर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सातव चौक येथील दोन जण, तर उर्वरित बार्शीटाकळी, जठारपेठ, सिध्दी विनायक कॉलनी, गौरक्षण रोड व माळा कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.


१३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, तर हॉटेल रिजेन्सी येथून दोन, अशा एकूण १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९०१९
- मृत -२८८
- डिस्चार्ज - ८२३०
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५०१

(संपादन - विवेक मेतकर)

loading image