esakal | कोरोना अपडेट: सकाळी एक तर सांयंकाळच्या अहवालात आणखी १० पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Corona Update: One in the morning and 10 more positive patients in the evening report

कोरोना संसर्ग तपासणीचे १०५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९५ अहवाल निगेटीव्ह तर १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये मंगळवारी (ता.१०) पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

कोरोना अपडेट: सकाळी एक तर सांयंकाळच्या अहवालात आणखी १० पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्ग तपासणीचे १०५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९५ अहवाल निगेटीव्ह तर १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये मंगळवारी (ता.१०) पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ८६०० झाली आहे. दिवसभरात १४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. विशेष म्हणजे सकाळच्या अहवालात फक्त एकच रुग्ण पॉझिटिव्ह आढळला असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वाटत होते.

बुधवारी दिवसभरात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका पुरुषांचा समावेश असून ते जठारपेठ, अकोला येथील रहिवासी आहे. आज सायंकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.

त्यातील लक्ष्मी नगर गोरक्षण रोड व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरीत मुर्तिजापूर, जीएमसी, रमाई अपार्टमेंट गोरक्षण रोड, छत्रपती कॉलनी गोरक्षण रोड व नूर प्लॉट जुने शहर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून दोन जण, ओझोन हॉस्पिटल येथून चार जण, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन जण, हॉटेल स्कायलार्क येथून एक जण, तर युनिक हॉस्पिटल येथून एक जण, अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


२२३ रुग्णांवर उपचार
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ८६०० आहे. त्यातील २८३ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ८०९४ आहे. सद्यस्थितीत २२३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image