
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात सोमवारी (ता. २३) दिवसभरात ११५ चाचण्या झाल्या, त्यात १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
अकोला ः कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात सोमवारी (ता. २३) दिवसभरात ११५ चाचण्या झाल्या, त्यात १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
अकोला ग्रामीण, अकोट, पातूर, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाहीत. बाळापूर येथे १४ चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही
हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी
. तेल्हारा येथे १३ चाचण्या झाल्या, त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाहीत.
हेही वाचा - धरणाचं पाणी पेटतंय, वानच्या पाण्याची पळवा-पळवी न थांबल्यास धरणावर आंदोलन
अकोला आयएमए येथे १५ चाचण्या झाल्या, त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ३२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. वैद्यकीय महाविद्यालय येथे २६ चाचण्या झाल्या,
हेही वाचा - VIDEO: प्रेरणादायी: भिंती बोलू लागल्या! आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी कहाणी
त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हेडगेवार लॅब येथे १५ चाचण्या झाल्या, त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अशा दिवसभरात ११५ चाचण्यांमध्ये १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
(संपादन - विवेक मेतकर)