
पातूर तालुक्यातील उत्पन्नात अव्वल असणारी ग्रामपंचायत म्हणून चान्नी ओळखल्या जाते. परंतु चान्नी येथील शेकडो महिलांनी ग्रामपंचायतींत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून एकच काम वेगवेगळ्या फंडातून दाखवून त्याचा निधी लाटल्याचा आरोप पातूरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केला आहे.
चान्नी (जि.अकोला) ः पातूर तालुक्यातील उत्पन्नात अव्वल असणारी ग्रामपंचायत म्हणून चान्नी ओळखल्या जाते. परंतु चान्नी येथील शेकडो महिलांनी ग्रामपंचायतींत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून एकच काम वेगवेगळ्या फंडातून दाखवून त्याचा निधी लाटल्याचा आरोप पातूरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केला आहे.
त्यानुसार पातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गवई, प्रशासक मोकळकर, सचिव आर.के. बोचरे यांनी ९ नोव्हेंबररोजी महिला समक्ष चौकशी करण्याचे पत्र दिले. त्यानुसार तक्रारकर्त्या महिला ९ नोव्हेंबररोजी सकाळी ग्रामसचिवालयात जमा झाल्या.
चौकशी अधिकारी येणार म्हणून सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ताटकळत महिला बसलेल्या होत्या. चौकशी अधिकारी गवई, मोकडकर आले आणि ग्रामसेवकांनी दोन दिवस सुट्टीचा अर्ज केला म्हणून चौकशी करता येणार नसल्याचे सांगितले.
त्यावरून सदर महिला खवळल्या आणि पातूरला जायचं का म्हणून गवई साहेबांना विचारत होत्या. सदर घटनेची माहिती विस्तार अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून दिली. त्यानुसार १२ नोव्हेंबररोजी चौकशी होणार असल्याचे विस्तार अधिकारी यांनी सांगितले. चौकशी न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचे महिला बोलत होत्या.
(संपादन - विवेक मेतकर)