दिवाळी आटोपताच रुग्णांची संख्या वाढली, जिल्ह्यात ३० पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 20 November 2020

दिवाळीसाठी खरेदीकरिता बाहेर पडलेल्या नागरिकांकडून झालेल्या दुर्लक्षाचे परिणाम दिसू लागले आहेत.

अकोला  ः दिवाळीसाठी खरेदीकरिता बाहेर पडलेल्या नागरिकांकडून झालेल्या दुर्लक्षाचे परिणाम दिसू लागले आहेत.

अकोला जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे २८० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. एका कोरोना संसर्गीत रुग्णाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.१७) रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये २९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, बुधवारी दिवसभरात ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 10 महिला व २० पुरुषांचा समावेश आहे.

त्यातील मोठी उमरी, गौरक्षण रोड व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, गजानन पेठ, निमवाडी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित आळशी प्लॉट, शास्त्री नगर, पिकेव्ही, वाडेगाव, राधेनगर, गड्डम प्लॉट, देवी खदान , मलकापूर, बाळापूर, कौलखेड, विद्या नगर, हरिहरपेठ व जळगाव नहाटे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

चार जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक जण, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून दोन जण, अशा एकूण चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

जामठी येतील एकाचा मृत्यू
बुधवारी एका कोरोना संसर्गीत रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जामठी बु. ता मुर्तिजापूर येथील ८० वर्षीय महिला असून, ती ता.१४ नोव्हेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ८८३६ आहे. त्यातील २८६ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ८१७३ आहे. तर सद्यस्थितीत ३७७ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. दिवाळी पूर्वी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०० च्या आत आली होती. आता हळूहळू ही संख्याही वाढत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: As Diwali approaches, number of patients increases, 30 positive in district, one dies