esakal | डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची नॅशनल रॅन्कींगमध्ये दहा अंकांनी झेप
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University jumps ten points in national rankings

 देशांतर्गत एकूण ७४ कृषी विद्यापीठे कार्यरत असून, विद्यापीठांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक तथा विस्तार कार्याचा वार्षिक आढावा भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीद्वारा दरवर्षी घेण्यात येतो. नुकताच सन २०१९ चा आयसीएआर मानांकन (रँकिंग) अहवाल जाहीर करण्यात आला असून, अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तब्बल १० अंकांनी झेप घेत ४८ व्या स्थानावरून ३८ व्या स्थानावर झेप घेतली आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची नॅशनल रॅन्कींगमध्ये दहा अंकांनी झेप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  देशांतर्गत एकूण ७४ कृषी विद्यापीठे कार्यरत असून, विद्यापीठांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक तथा विस्तार कार्याचा वार्षिक आढावा भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीद्वारा दरवर्षी घेण्यात येतो. नुकताच सन २०१९ चा आयसीएआर मानांकन (रँकिंग) अहवाल जाहीर करण्यात आला असून, अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तब्बल १० अंकांनी झेप घेत ४८ व्या स्थानावरून ३८ व्या स्थानावर झेप घेतली आहे.


भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीद्वारे जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी देशांतर्गत कृषी विद्यापीठांनी शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य, विविध पुरस्कार, संशोधनात्मक लेख, वार्षिक बजेट, पदभरती, प्रायोजित प्रकल्प आदींसह विविध विषयांवर केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

गत वर्षी मानांकनातील उणिवा, त्रुट्या, सादरीकरणाची पद्धती यावर सारासार विचार करीत कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विद्यापीठ स्तरावर रँकिंग समिती स्थापन केली होती. विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. महेंद्र नागदेवे यांच्या अध्यक्षतेत स्थापन केलेल्या या समितीमध्ये प्रा. डॉ. नितीन कोष्टी, प्रा. नितीन गुप्ता, प्रा.डॉ.अजय सदावर्ते, प्रा.डॉ.श्रीकांत ब्राह्मणकर, प्रा.डॉ. निरज सातपुते, प्रा.डॉ. मंगेश मोहरील यांचा समावेश होता.

विद्यापीठाचे आयसीएआर नोडल ऑफिसर डॉ. शशांक भराड सदस्य सचिव असलेल्या या समितीने संपूर्ण विद्यापीठ क्षेत्रातील कृषी महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, यासह विषयवार विभागांच्या तयारीचा ढाचा तयार केला होता.

विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठाचे संचालक संशोधन प्रा.डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण प्रा.डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता उद्यांविद्या प्रा.डॉ. प्रकाश नागरे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी प्रा.डॉ. सुधीर वडतकर यांचेसह सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्रक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात अल्प कालावधीत हे उद्दिष्ट साध्य केले.

या संपूर्ण प्रक्रियेत नोडल ऑफिसर प्रा.डॉ.शशांक भराड यांनी सर्वच स्तरावर निरंतर पाठपुरावा केला आणि त्यांचे कार्यालयातील सहकारी डॉ. अतुल वराडे, सचिन पाटील यांनी सहकार्य केले. कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी या यशाबद्दल विद्यापीठ परिवारातील सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी, कामगार, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image