esakal | कार चालवताना नियंत्रण सुटले, चालक ठार व पाच जण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Driver killed, 5 injured in car accident

अनियंत्रित भरधाव कार उलटल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १२) सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी (गवळी) जवळ बाळापूर पोलिसांच्या हद्दीत घडली

कार चालवताना नियंत्रण सुटले, चालक ठार व पाच जण जखमी

sakal_logo
By
अनिल दंदी

बाळापूर (अकोला)  : अनियंत्रित भरधाव कार उलटल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १२) सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी (गवळी) जवळ बाळापूर पोलिसांच्या हद्दीत घडली

. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. योगेश गायधने (४०, रा. नागपूर) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.

अकोल्याहून बाळापूरकडे एम.एच. ४९ बी.जी. ६५७७ या क्रमांकाची कार भरधाव वेगाने येत होती. सदर भरधाव कार राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी जवळ पोचताच चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार महामार्गाच्या बाजूला उलटली.

त्यामुळे अपघात होऊन कार चालक योगेश गायधने जागीच ठार झाला. यामधील शशांक राजपूत, मनीष बोरिकर, चेतन मुके, विजय चौधरी, दिनेश निकम हे पाच जण गंभीर जखमी झाले. हे सर्व जण नागपूर येथील रहिवासी असून ते नागपूरहून खामगावकडे जात होते.

घटनेची माहिती मिळताच बाळापूर व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी सर्वोपचारमध्ये दाखल रवाना केले. पोलिस हवालदार विजय जामनिक, संतोष गिरी या पोलिस कर्मचाऱ्यांसह महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राजू सोळंके, राजू अहिर, इंगळे या कर्मचाऱ्यांनी महामार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

(संपादन - विवेक मेतकर)