
दरवर्षी दिवाळी मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात येते. परंतु या वेळेस कोरोना महामारीचेे संकट संपूर्ण जगभर कोसळलेले आहे. अद्यापही त्यावर लस निघाली नाही. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण उत्साहाचे वातावरण असते.
अकोट (जि.अकोला) : दरवर्षी दिवाळी मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात येते. परंतु या वेळेस कोरोना महामारीचेे संकट संपूर्ण जगभर कोसळलेले आहे. अद्यापही त्यावर लस निघाली नाही. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण उत्साहाचे वातावरण असते.
परंतु फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण,वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतो. पण आता फटाकेमुक्त दिवाळी कशी साजरी करता येईल या उद्देशाने अकोट तालुक्यातील आकोलखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेने ‘एक घर एक पुस्तक’ अभियान संपूर्ण जिल्हाभरात १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत राबविण्याचे ठरविले आहे.
युपीएससी, एमपीएससी, रेल्वे, नेट, सेट, बँक, पोलिस भरती यासारख्या विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अधिकारी होण्याच्या दृष्टीने प्रेरीत करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसह महापुरुषांची तसेच नामवंत लेखकांची पुस्तके, ग्रंथ, कादंबरी गोळा करण्यात येणार आहे.
जेणेकरून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प हा ‘एक घर एक पुस्तक’ या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्णत्वास जाईल. या अभियानामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष ललित नगराळे यांच्यासह गोपाल गणोरकार, सुमेध डोंगरदिवे, देवांग सिरसाट, आदित्य नगराळे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)