esakal | ऐन दिवाळीच्या दिवशी मॉलमधील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: An electronic shop in the mall caught fire on Diwali day

बुलडाणा शहरातील मध्यभागी असलेल्या डीएसडी मॉल मधील इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाला दिवाळीच्या दिवशी सायंकाळी आग लागून संपूर्ण दुकान जाळून खाक झाले. यात दुकान मालकाचे अंदाजे ४० लांखांचेनुकसान झाले. सुदैवाने आग लवकर आटोक्यात अली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

ऐन दिवाळीच्या दिवशी मॉलमधील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा  ः बुलडाणा शहरातील मध्यभागी असलेल्या डीएसडी मॉल मधील इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाला दिवाळीच्या दिवशी सायंकाळी आग लागून संपूर्ण दुकान जाळून खाक झाले. यात दुकान मालकाचे अंदाजे ४० लांखांचेनुकसान झाले. सुदैवाने आग लवकर आटोक्यात अली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.


शहरातील मध्यवस्तीत असलेल्या डीएसडी मॉल मध्ये विविध व्यवसायाची दुकाने आहेत. बँक ऑफ इंडियाच्या खाली तळमजल्यावर शिवकृपा इलेक्ट्रोनिक हे दुकान सुभाष कुटे यांच्या मालकीचे आहे.

१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी लक्ष्मी पूजन करून दुकान मालक सुभाष कुटे घरी गेले. मात्र काही वेळातच दुकानातुन धुराचे लॉट येत असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. याची माहिती तात्काळ पोलीस व नगर पालिकेला देण्यात आली.

नगरपालिकेचे अग्निशमन दल पोहचण्या आधी आगीने अक्राळ विक्राळ रूप धारण करू संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. अशातही अग्निशमन दलाने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दुकानाचे शटर तोडून ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत दुकानातील इलेक्ट्रॉनिक्सचे सर्व साहित्य जळून खाक झाले होते. यात तुकांमलक कुठे यांचे अंदाजे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले.

...तर अनर्थ घडला असता!
कुटे यांचे इलेक्ट्रॉनिक दुकान तळमजल्यावर आहे. त्यांच्या दुकानाच्या वरील मजल्यावर बँक ऑफ इंडिया आहे. आग लागली तेव्हा काही दुकानात दुकानदार पूजा करीत होते.

त्यामुळे आग लगेच लक्षात आली. तरीही या आगीच्या झळा बँक ऑफ इंडिया सह नजीकच्या दुकानदारांना बसल्या.संजय आराख यांच्या ऑनलाइन सेंटरमध्ये धुराचे लोट गेल्याने व वायरिंग जाळल्याने कॉम्पुटर जाळले. दुकानाचे नुकसान झाले.

तर शिलाई मशीनचे काम करणाऱ्या दुकानाचे नुकसान झाले. ही आग रात्री लागली असती तर बँकेला सुद्धा धोका झाला असता. दरम्यान, दुसरे दिवशी आ. संजय गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.तसेच अधिकाऱ्यांना पंचनामा करून अहवाल देण्याचे निर्देश दिले.

(संपादन - विवेक मेतकर)