देशात छुप्या मार्गाने आणीबाणी; राष्‍ट्रवादीच्या नेत्या खासदार फौजीया खान यांचा आरोप

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 8 December 2020

देशात सध्या आणीबाणी सदृस्य परिस्थिती आहे. इंदिरा गांधी यांनी त्यावेळी देशावर लादलेल्या आणीबाणीप्रमाणेच परिस्थिती सध्या असून, छुप्या मार्गाने देशावर आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजीया खान यांनी सोमवारी (ता.७) अकोला येथे पत्रकार परिषदेत केला.

अकोला : देशात सध्या आणीबाणी सदृस्य परिस्थिती आहे. इंदिरा गांधी यांनी त्यावेळी देशावर लादलेल्या आणीबाणीप्रमाणेच परिस्थिती सध्या असून, छुप्या मार्गाने देशावर आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजीया खान यांनी सोमवारी (ता.७) अकोला येथे पत्रकार परिषदेत केला.

अकोला येथील एका स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या खासदार फौजीया खान यांनी महिला मेळाव्याला संबोधित करण्यापूर्वी स्थानिक शासकीय विश्रामगृहात पत्रकारांसोबत संवाद साधला.

या पत्रकार परिषदेला आमदार अमोल मिटकरी, राकाँच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. आशाताई मिरगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंदाताई देशमुख, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदाणी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार फौजीया खान यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले असल्याचे सांगितले. भारत बंदला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. कृषी कायदे मंजूर करताना भाजपने मनमानी केल्याचा आरोप करीत देशातील एकूणच परिस्थिती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील आणीबाणीप्रमाणेच असल्याची त्या म्हणाल्यात.

. इंदिरा गांधी देशावर उघडपणे आणीबाणी लादली होती, सध्या छुप्या मार्गाने देशाला आणीबाणीत लोटले जात आहे. इंदिरा गांधी यांनी झालेल्या चुकीची माफी मागीतली होती. आता मात्र जाणीवपूर्वक चुकी केली जात असल्याचा आरोपही खासदार फौजीया खान यांनी केला.

महिला असुरक्षित
या देशात महिलांवर हातरस घटने प्रमाणे अत्याचार वाढले आहेत. देशातील महिला असुरक्षित असल्याचे खासदार फौजीया खान म्हणाल्यात. देशात्या संविधानही संकट असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 
अमरावती विभागात लढलो!
राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले असले तरी अमरावती विभागातील अपयशाची कारणे शोधून काढू. येथे पराभव झाला असला तरी महाविकास आघाडीने येथे चांगला लढा दिल्याचे खासदार फौजीया खान म्हणाल्या.
 
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- आमदार मिटकरी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी गंभीर आहे. येत्या पंधरा दिवसात जिल्ह्यात सर्वत्र मेळावे घेवून कर्जमाफीपासून सर्व प्रश्नांबाबत काही अडचणी असतील तरी त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Emergency in the country secretly; Nationalist leader MP Faujia Khan accused