निवडणूक आली रे ऽऽऽ, चला, फ्लेक्स काढा, बॅनर काढा

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 7 November 2020

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी शहरातील राजकीय पक्षांच्या जाहिरातीचे फ्लेक्स व बॅनर काढण्याची कारवाई मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाने शुक्रवारी केली.

अकोला  ः अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी शहरातील राजकीय पक्षांच्या जाहिरातीचे फ्लेक्स व बॅनर काढण्याची कारवाई मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाने शुक्रवारी केली.

सोबतच बाजार विभागासोबत संयुक्त कारवाई करीत दिवाळी बाजारीतील रस्त्यावरील अतिक्रमण व पक्‍क्या दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले.

कोरोना विषाणू संसर्गामुळे मार्चपासून महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे काम ठप्प होते. आता मात्र शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू होतात पुन्हा अतिक्रमण निर्मुलन विभाग सक्रिय झाला आहे.

मनपाच्या पथकाने गांधी रोडसह शहरातील विविध भागात ही मोहीम राबविली. गुरुवारी रात्रीपासूनच राजकीय पक्षांच्या जाहिराती काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळीच गांधी रोडवरील हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले.

त्यानंतर अतिक्रमण विभागाने बस स्थानक चौक, अशोक वाटिका चौक, गौरक्षण रोड परिसरातही ही कारवाई करण्यात आली. बाजार विभागासोबत राबविण्यात आलेल्या कारवाईत दुकानांचे रस्त्यावर आलेले व वाहतुकीस अडथळा ठरणारे बॅनर, नामफलक हटविण्याची कारवाई करण्यात आली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Encroachment eradication campaign due to election code of conduct of teachers constituency