esakal effect:  महावितरणला मिळाला कायमस्वरूपी अधिकारी, ग्राहकांनी मानले आभार

Akola News: esakal effect: MSEDCL gets permanent officer
Akola News: esakal effect: MSEDCL gets permanent officer

सिंदखेड राजा (जि.बुलडाणा):  येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण मर्यादित विभागा अंतर्गत उपकार्यकरी अभियंता पद मागील चार महिन्यापासून रिक्त होते.

त्यामध्ये महत्वाचे पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता. सिंदखेड राजा महावितरण राम भरोसे असल्यामुळे उपकार्यकरी अभियंता हे मुख्य पदच रिक्त असल्यामुळे व कागदोपत्री महावितरण'चा कारभार कोणाकडेच नसल्यामुळे अजब कारभार पाहायला मिळत होता.

 त्यामुळे सेवेचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या समस्या वेळेवर सुटत नाही. विशेषतः तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाशी च्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वीज वितरण कंपनी बदल असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे महावितरण विभागाला रिक्त पदाच्या शॉक मधून बाहेर काढणे गरजेचे आहे. अन्यथा ग्राहकांच्या समस्यांरुपी फेजला ग्रहण लागण्याची शक्यता आहे.सद्या सणासुदीत महावितरणाला सेवेची अलर्जी, उपकार्यकारी अभियंता पदांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह अशी बातमी प्रकाशित करण्यात आली होती.

बातमीची दखल घेवून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी तात्काळ उपकार्यकारी अभियंता ए. एम. खान यांना रुजू  होण्याचे आदेश दिल्यामुळे  उपकार्यकारी अभियंता ए. एम.खान हे तारीख १९ नोव्हेंबर रोजी रुजू झाले आहेत. त्यामुळे महावितरणचे कार्यभार सुरळीत चालण्यास मदत होणार आहे, कायम स्वरूपी उपकार्यकारी अभियंता मिळाल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

महाविरणच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची गरज
सिंदखेड राजा महाविरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे, कार्यालयातील कर्मचारी हे नेहमीच कार्यालयात थांबत नसल्यामुळे विनाकारण ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. कर्मचारी नेहमी हॉटेल मध्ये राहत असतात शेतकऱ्यांना व ग्राहकांना कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी हॉटेल मध्ये भेटण्यासाठी जावे लागते.मागील काही वर्षापासून महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा बेजबाबदारपणाच्या कामकाजामुळे  शेतकऱ्यांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कर्मचारी कार्यालयात कमी व बाहेरच जास्त राहत असतात. त्यामुळे उपकार्यकारी अभियंता ए. एम.खान हे कर्मचार्‍यांना शिस्त लावतात का ? हे पाहावे लागणार आहे.

सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मागील चार महिन्यापासून उपकार्यकारी अभियंता हे पद रिक्त होते. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्राहकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता, शेतकऱ्यांना व नागरिकांना जाण्यायेण्याचा वेळ व पैसे खर्च करून सुद्धा काम होत नव्हते. त्यामुळे दैनिक सकाळ ने वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करून कायम स्वरुपी उपकार्यकारी अभियंता मिळवून दिला त्याबद्दल दैनिक सकाळचे आभार.
- सुनील गोरे, सरपंच हिवरखेड पुर्णा


सिंदखेड राजा येथील उपकार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार घेतला असून तालुक्यातील वीज वितरणाची पहाणी करून समोरील कामकाजाची दिशा ठरवुन तालुक्यातील महावितरण'च्या सहकाऱ्यांना सोबत घेवून सर्वमान्य नागरिक व शेतकऱ्यांना यापुढे वीज व महावितरण च्या सेवेबद्दल कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.यासाठी प्रयत्न करणार आहे.
- ए. एम.खान, उपकार्यकारी अभियंता महावितरण सिंदखेड राजा 

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com