esakal | नदी आटली तरी विश्वगंगेवरील पुलाला अजूनही मुहूर्त सापडेना!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Even though the river is blocked, the bridge over the Vishwaganga has not been found yet!

लॉकडाउनच्या अगोदर प्रत्यक्षात कामाला सुरू झालेला टाकरखेड गावाजवळील विश्वगंगा नदीवरचा पूल जवळपास गेल्या एक वर्षांपासून रखडला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पूल होऊ न शकल्याने टाकरखेड ते मलकापूर रस्ता संपूर्ण पावसाळाभर नदीला पाणी वाहत असल्याने वाहतुकीस बंद पडला होता.गाव व वस्तीचा संपर्क पण काही काळ बंद पडला होता.

नदी आटली तरी विश्वगंगेवरील पुलाला अजूनही मुहूर्त सापडेना!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

नांदुरा (जि.बुलडाणा) ः लॉकडाउनच्या अगोदर प्रत्यक्षात कामाला सुरू झालेला टाकरखेड गावाजवळील विश्वगंगा नदीवरचा पूल जवळपास गेल्या एक वर्षांपासून रखडला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पूल होऊ न शकल्याने टाकरखेड ते मलकापूर रस्ता संपूर्ण पावसाळाभर नदीला पाणी वाहत असल्याने वाहतुकीस बंद पडला होता.गाव व वस्तीचा संपर्क पण काही काळ बंद पडला होता.

शेतकऱ्यांचे पण अतोनात हाल झाले असतांनाही संबंधित कंत्राटदार व शासकीय अधिकाऱ्यांनी फिरकूनही पाहिले नव्हते.सद्या गेल्या १५ दिवसापासून या 'विश्वगंगा'नदीचे पाणी पूर्णतः आटले असतांनाही संबंधित अधिकारी फिरून पहायलाही तयार नसल्याने हा पूल यावर्षीही पूर्णत्वास जाईल की नाही याबाबत गावकऱ्यात शंका उपस्थित होत आहे.

हेही वाचा - शाळांची घंटी आजपासून वाजणार; पालकांची लेखी संमती आवश्यक


शेंबा,टाकरखेड परिसरातील २० ते २५ खेड्यांसाठी अतिशय शॉर्टकट मलकापूर जाणाऱ्या टाकरखेड ते तालखेड मार्गावर टाकरखेड गावाशेजारी विश्वगंगा नदीवर गेल्या जवळपास एक वर्षांपासून पूल साकारतोय.पूल बांधकाम पावसाळ्यापूर्वी व्हावे असे नियोजन असतानाच कोरोनाचे सावट घोंगावल्याने लॉगडाउन जाहीर झाल्याने मजुरांनी घरची वाट धरली.पूल अर्धवट झाला असतांना पर्यायी व्यवस्था काढण्यास वेळोवेळी संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने गाव व वस्तीचा नदीला पाणी राहिल्याने संपर्क तुटला.रस्ता पूर्ण पावसाळ्यात बंद पडल्याने पायी जाण्याची पंचाईत झाल्याने गावकऱ्यांसोबतच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

हेही वाचा -  भाजप म्हणतेय, शाळा बंदच ठेवा; गरिबाच्या मुलांना मोफत स्मार्ट फोन द्या

या संपूर्ण सहा महिन्यांच्या काळात अधिकारी किंवा कंत्राटदाराने फिरकूनही पाहिले नाही.हे विशेष.सद्या नदी आटली असून पुलाचे अर्धवट असलेले बांधकाम करण्यासाठी आवश्यक वेळ असतांनाही अजूनही अधिकारी किंवा कंत्राटदार फिरकून पाहत नसल्याने पुढील पावसाळाही असाच जाणार की काय अशा शंका उपस्थित होत असल्याने या पुलाचे बांधकाम संबंधित विभागाने लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


पर्यायी व्यवस्था काढून देण्यासाठी शिवसेना सरसावली
संपूर्ण पावसाळ्यात कमरेपर्यंतच्या पाण्यातून प्रवासी जीवघेणा प्रवास करीत असल्याचे चित्र पाहता गावकऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरले तर शिवसेना तालुका प्रमुख संतोष डीवरे यांनी स्वतः पाईप उपलब्ध करून जेसीबीच्या माध्यमातून पाईप टाकत पायी व मोटरसायकल करिता रस्ता काढून दिल्याने पावसाळ्यात जनतेचे होत असलेले हाल कमी केले.मात्र अधिकारी व कंत्रातदाराने साधे फिरूनही पाहिले नव्हते.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image