एका शेतकऱ्याने कालवा अडवून शेकडो शेतकऱ्यांना धरले वेठीस, पाण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यास घातला घेराव

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 8 December 2020

नारायणखेड उपसा सिंचन अंतर्गत कालवा अर्धवट राहिल्याने पुढील चार गावांना सिंचनाचा लाभ मिळत नाही परिणामी असंख्य शेतकरी गत चार वर्षापासून वंचित राहिले आहे

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा)  ः नारायणखेड उपसा सिंचन अंतर्गत कालवा अर्धवट राहिल्याने पुढील चार गावांना सिंचनाचा लाभ मिळत नाही परिणामी असंख्य शेतकरी गत चार वर्षापासून वंचित राहिले आहे .

दरम्यान कालव्याचे अर्धवट काम तात्काळ पूर्ण करून मौजे सुरा,सरंबा,धोत्रानंदई येथील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ द्या यासाठी आज (ता.७)खडकपूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यास घेराव घालून शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला वेळप्रसंगी पोलिस संरक्षण घेऊन कालव्याचे काम मार्गी लावा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला

खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत नारायणखेड उपसा सिंचन योजनेद्वारे कालव्याचे काम एका शेतकऱ्याने अडविल्याने १०० मीटर कालवा अर्धवट सोडून पुढील काम पूर्ण करण्यात आले होते. दरम्यान अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला भूसंपादन बाबत मोबदला संबंधित विभागाकडे निधी स्वरूपात मिळाला असूनही कालव्याचे काम अर्धवट असल्याने पुढील तीन गावांना खडकपूर्णाचे पाणी सिंचनासाठी मिळत नाही.

त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य शिलाताई शिंपणे यांच्यासह सुरा,सरंबा,धोत्रा नंदई येथील शेतकऱ्यांनी खडकपूर्णा प्रकल्प कार्यालय गाठले आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव घालून आपल्या समस्या मांडल्या याप्रसंगी खडकपूर्णा विभागाच्या श्रीमती देशपांडे यांच्याशी चर्चा करून तत्कालीन अधिकारी यांनी कालव्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. 

मात्र  सदर काम अद्यापही अर्धवट  राहिले  असल्याने सिंचनासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी तात्काळ सोडा अर्धवट राहिलेले काम पोलीस संरक्षणात दोन दिवसात पूर्ण करा अन्यथा सिंचनापासून वंचित शेतकरी आपल्या कार्यालयावर आंदोलन छेडतील असा इशारा जिल्हा परिषद सदस्य शिंपणे यांनी यावेळी दिला.

तर उपस्थित शेतकऱ्यांनी खडकपूर्णा विभागाकडे निवेदनाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या याप्रसंगी खडकपूर्णा प्रकल्प कार्यालयात श्रीमती शिंपणे यांच्यासह माजी सरपंच गजानन चेके, रोशनखा पठा,बंडू चेके,दिनेश मुंडे,सर्जेराव चेके,दगडूबा चव्हाण,मनोहर चेके,ज्ञानेश्वर चेके,अनंता चेके,सोमनाथ चेके,विठ्ठल काकडे,शिवानंद मुंडे,प्रल्हाद खेडेकर,प्रभाकर चेके,गजानन रामकृष्ण चेके,शिवप्रसाद चेके,दिनकर चेके आदींची उपस्थिती होती.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: A farmer blocked a canal and arrested hundreds of farmers, farmers surrounded the officer for water