esakal | सीसीआयच्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Farmers turn their backs on CCIs cotton procurement

भारतीय कापूस महामंडळा (सीसीआय) च्या कापूस खरेदीला सुरूवात झाली असून, शेतकऱ्यांनी मात्र खासगी व्यापाऱ्यांना प्राधान्य देत सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे पाहवयास मिळाले आहे.

सीसीआयच्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

sakal_logo
By
आविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि.अकोला) : भारतीय कापूस महामंडळा (सीसीआय) च्या कापूस खरेदीला सुरूवात झाली असून, शेतकऱ्यांनी मात्र खासगी व्यापाऱ्यांना प्राधान्य देत सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे पाहवयास मिळाले आहे.


यंदा बोंडअळीच्या आक्रमणामुळे मुळात कापसाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची मागणी मोठी आहे. त्यात गुरुवारी (ता.१९) पासून भटोरी रस्त्यावरील ओम जिनिंग व दर्यापूर रस्त्यावरील व्यंकटेश जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ ज्येष्ठ सहकार नेते ॲड. भैयासाहेब तिडके यांच्या हस्ते झाला आहे. आजवर केवळ २५५३ शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर नोंद केली आहे व १ हजार ५०५ क्विंटल ३० किलो कापसाची खरेदी झाली आहे.

सीसीआय चा कापसाचा दर प्रतिक्विंटल ५ हजार ७२५ रुपये आहे. खासगी व्यापारी ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत. रब्बीचा खर्च व अन्य गराजांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांना नगदी व तात्काळ पैसे मिळणे आवश्यक आसते.

सीसीआय महिनाभराने पैसे देते. खासगी व्यापारी लगेच रोख रक्कम देतात किंवा आरटीजीएसने पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करतात. मागणी जास्त असल्यामुळे नजिकच्या काळात भाव वाढतील या अपेक्षेने शेतकरी तग धरून आहेत. या सर्व बाबींचा परीणाम म्हणून शेतकरी बांधवांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकण्यास प्राधान्य देवून सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.सीसीआयची कापूस खरेदी दोन्ही संकलन केंद्रावर सहजसुलभ पद्धतीने सुरू आहे. सर्व सुविधा मिळत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा.
-ॲड.अविन अग्रवाल. संचालक, ओम जिनिंग, मूर्तिजापूर.शेतकऱ्यांकडून प्रतिक्षा
गरज हा शेतकऱ्याचा भाव आहे. कुठल्याही कृषी उत्पादनाला वेळेत भाव मिळाला, तरच शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी गरजपूर्तीसाठी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकला आहे. काही भाव वाढण्याची वाट बघत आहेत.


ओम जिनिंग आणि व्यंकटेश जिनिंग मध्ये कापूस खरेदी सीसीआयने सुरू केली असून, हातगाव रस्त्यावरील लक्ष्मी जिनिंग मध्ये दोन दिवसात सुरू होईल. शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
-रितेश मडगे. सचिव, कृउबास, मूर्तिजापूर.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image