मृत्यूचे भय कायम, आणखी चार बळी; 19 पॉझिटिव्ह

सुगत खाडे  
Saturday, 10 October 2020

कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. ९) १४९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४२ अहवाल निगेटिव्ह तर सात अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासह १२ जणांचा अहवाल रॅपिड तपासणीत पॉझिटिव्ह आला. याव्यतिरीक्त चार रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतकांची संख्या २५३ झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सुद्धा भर पडली आहे.

अकोला  ः कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. ९) १४९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४२ अहवाल निगेटिव्ह तर सात अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासह १२ जणांचा अहवाल रॅपिड तपासणीत पॉझिटिव्ह आला. याव्यतिरीक्त चार रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतकांची संख्या २५३ झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सुद्धा भर पडली आहे.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्तेत सतत वाढ होत असून मृतकांच्या संख्येत सुद्धा दिवसेंदिवस भर पडत आहे. दरम्यान कोरोनामुळे शुक्रवारी (ता. ९) चार जणांचा मृत्यू झाला.

त्यात निंभोरा, अकोला येथील ५६ वर्षीय पुरुष असून त्याल ७ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा बळी फिरदोस कॉलनी येथील ६८ वर्षीय पुरुषाचा गेला. त्याला १८ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

तिसरा बळी तेल्हारा येथील ३५ वर्षीय पुरुषाचा गेला. त्याला २३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. चौथा बळी वाडेगाव, ता. बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुषाचा गेला. त्याला २९ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. सदर चार मृत्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत २५३ रुग्णांचा बळी गेला. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाचे सध्या जिल्ह्यात ७२७ रुग्ण उपचार घेत आहेत.

या भागात आढळले नवे रुग्ण
कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. ९) १९ अहवाल पॉझिटिव्ह आले. व्हीआरडीएल लॅबमधून आलेल्या सात अहवालांचा समावेश आहे. सदर रुग्ण दिग्रस ता. पातूर, व्याळा ता. बाळापूर, जीएमसी क्वॉटर, राजीव गांधी नगर, जीएमसी, कोठारी नगर व निंबा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे.

८५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून शुक्रवारी (ता. ९) २४ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून पाच, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल मूर्तिजापूर येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केलेल्या ५० जणांना अशा एकूण ८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Fear of death persists, four more death due to corona; 19 Positive