मध्यभारतात ‘बाज’ पक्षाची पहिली नोंद, ‘अपलँड बजर्ड’ पक्षाची छबी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: First record of falcon party in Central India, image of upland buzzard party captured in their camera

मध्यभारतात दुर्मिळ अशा ‘बाज’ पक्षाची पहिली नोंद झाली असून, अकोल्यात पक्षी अभ्यासक समिश धोंगळे यांनी या ‘अपलँड बजर्ड’ पक्षाची छबी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

मध्यभारतात ‘बाज’ पक्षाची पहिली नोंद, ‘अपलँड बजर्ड’ पक्षाची छबी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद

अकोला  ः मध्यभारतात दुर्मिळ अशा ‘बाज’ पक्षाची पहिली नोंद झाली असून, अकोल्यात पक्षी अभ्यासक समिश धोंगळे यांनी या ‘अपलँड बजर्ड’ पक्षाची छबी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

हिवाळा हा नव्या-जाणत्या पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणीचा काळ असतो. पक्षांचे सर्वाधिक स्थलांतर हे हिवाळ्यात घडून येते. व्यक्तीगत तसेच आपल्या जिल्ह्याच्या पक्षीसूचित नवीन भर पडावी यासाठी प्रत्येक पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक हा प्रयत्नरत असतो.

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वनविद्या शाखेचे विद्यार्थी व पक्षी अभ्यासक समिश धोंगळे यांना पक्षी निरीक्षणादरम्यान आकाशातून उंचीवरून उडान करणारा एक पक्षी दृष्टीस पडला. उत्सूकतेपोटी त्यांनी तो कॅमेऱ्यात टिपला.

फोटोचे विश्‍लेषण केल्यावर तो दुर्मिळ प्रकारातील ‘बाज’ पक्षी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. फोटो आयडीसाठी तज्ज्ञ पक्षी अभ्यासकांचे मत जाणून घेतल्यावर तो फक्त हिमालयात स्थलांतर करणारा ‘अपलँड बजर्ड’ असल्याचे निष्पन्न झाले. याकरिता पक्षांचे सुक्ष्म अभ्यासक निनाद अभंग तसेच शिशीर शेंडोकार, मिलींद सावदेकर यांचे सहकार्य लाभले.


पक्षांच्या नवीन नोंदी व निसर्गाचा सुक्ष्म अभ्यास यासाठी ‘सातत्य’ ही गोष्ट सगळ्यात गरजेची असते. निसर्ग हा तुमचा जगण्यात नावीन्य आणि उत्सुकता टिकवता ठेवतो. जे खऱ्या अर्थांने ‘जीवन’ आहे!
- समिश धोंगळे, पक्षी व निसर्ग अभ्यासक

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top