मुख्यमंत्री महोदय, सोयाबीन कापणी, कापूस वेचणी घरात बसून करायची का?

Akola News: Former Agriculture Minister Anil Bonde criticizes Chief Minister Uddhav Thackeray
Akola News: Former Agriculture Minister Anil Bonde criticizes Chief Minister Uddhav Thackeray

अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करता येईल का असे सांगून शेतकरी व मजुरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. सोयाबीन कापणी, कापूस वेचनी, पिकांना पाणी घरात बसून रिमोटने देणार आहात का? मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांना मदत देता येत नसेल तर देऊन नका, पण ही थट्टा थांबा, असे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.


अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथे किसान रॅलीसाठी ते आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ऑनलाईन सभेत शेतकऱ्यांनी ‘वर्क फ्रॉम होम करता येईल का, यासाठी प्रयत्न करता येईल का, असे म्हटले होते.

याबाबत मात्र माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी शेतीचा अभ्यास करावा, तरच शेतीवर बोलावे.

कापूस जर वेचायचे असेल तर बोंड का ‘वर्क फ्रॉम होम’ ने वेचणार आहा का? ओलित घरी बसून करता येते का? म्हणून मुख्यमंत्रीजी आपण वर्षभराआधी जे बोलले होते, ते आठवा. वर्षभरापूर्वी अतिवृष्टी झाली तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना जीरायत शेतीसाठी २५ हजार रुपये आणि बागायतदारांना ५० हजार रुपये हेक्टररी मदत करण्याची मागणी केली होती. आता तुम्हीच स्वतः मुख्यमंत्री आहात. हा शब्द पाळा, असे आवाहन माजी कृषी मंत्री बोंडे यांनी केले.


राजकारणापायी शेतकरी वेठीस
कृषी विषय कायदे केंद्र सरकारने करून शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बंधनातून मुक्त केले. मात्र राज्यात या कायद्याची अंमलबजावणी थांबवण्याचे राजकारण सुरू आहे. राजकारणापायी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. हा शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. विरोधात शेतकरी रस्त्यावर आल्यास परिणाम भोगावे लागेल असा इशारा माजी मंत्री अनिल बोंडे यांनी दिला.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com