esakal | पालिकेवर धडकली अंत्ययात्रा, कोष्टी समाजाच्या अक्रोशाने पालिका प्रशासनाची तारांबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Funeral hit on the Municipal Corporation

आठ वर्षांपूर्वी पालिकेने कोष्टी समाजाकरिता आरक्षित केलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली मात्र नगरपालिका व महसूल प्रशासनाने ह्या गैरप्रकाराकडे कानाडोळा केला .

पालिकेवर धडकली अंत्ययात्रा, कोष्टी समाजाच्या अक्रोशाने पालिका प्रशासनाची तारांबळ

sakal_logo
By
मुशीरखान कोटकर

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा  : आज सकाळी कोष्टी समाजातील दुर्गापुरा येथील सत्यभामा जनार्धन एलगीरे या ८२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झाले.

आता अंत्यसंस्कार करायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला अन् सत्यभामा बाई यांची अंत्ययात्रा नगरपालिकेवर धडकली अंत्ययात्रेत सहभागी महिला पुरुषांनी स्मशानभूमी वरील अतिक्रमण त्वरित हटवा अशी मागणी करीत पालिकेच्या प्रवेशद्वारावर तिरडी ठेवली.

या प्रकारानंतर पालिका प्रशासना ची तारांबळ उडाली. दरम्यान  कोष्टी समाजातील प्रमुख व्यक्ती, काही नगरसेवक यांनी पालिका मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्याशी चर्चा केली.  यावेळी पालिकेने नियोजित स्मशानभूमीच्या आरक्षित जागेवर बांधण्यात आलेली घरे तात्काळ हटविण्याच्या संदर्भात लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा पालिकेच्या प्रवेशद्वारावर चितागणी देऊ अशी भूमिका कोष्टी समाजाने घेतली.

तर ही जागा अद्यापही महसूल विभागाच्या नावे असल्याने बांधण्यात आलेली अतिक्रमित घरे पाडण्याचा आम्हाला अधिकार नाही. महसूल विभागा सोबत संयुक्त कारवाईत सहभाग देऊ, अशी भूमिका मुख्याधिकारी यांनी घेतली.

यावरून काही वेळ मुख्याधिकारी यांच्या दालनात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते तीन तासानंतर अतिक्रमण उठविण्यास संदर्भात लगेच कारवाई ला सुरुवात करू व दीड महिन्यात स्मशानभूमीच्या नियोजित जागेवर असलेले अतिक्रमण हटवू या लेखी आश्‍वासनानंतर अंत्यसंस्कार नियोजित सर्व्ह नंबर ४ मध्ये करण्यात आले.

आठ वर्षांपूर्वी पालिकेने कोष्टी समाजाकरिता आरक्षित केलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली मात्र नगरपालिका व महसूल प्रशासनाने ह्या गैरप्रकाराकडे कानाडोळा केला .

समाजाच्या या संवेदनशून्य प्रवृत्तीच्या निषेधार्थ आज (ता.१३) कोष्टी समाजातील एका वृद्ध महिलेची अंतयात्रा नगरपालिके वर धडकली प्रवेशद्वार समोर तब्बल तीन तास तिरडी ठेवून प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला दरम्यान लेखी आश्‍वासनानंतर अंत्यसंस्कार झाले.

काय आहे प्रकार
शहरालगत असलेल्या खंडोबा टेकडी च्या पायथ्याशी सर्वे नंबर ४ मधील ४० आर जमीन महसूल विभागाच्या परवानगी दिल्यानंतर नगरपालिकेने कोष्टी समाज स्मशानभूमीसाठी आरक्षित केली होती सदर स्मशानभूमी च्या संरक्षण भिंती साठी सहा लाख रुपयांचा निधी पण शासनाने मंजूर केला मात्र नगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीमुळे सदर संरक्षण भिंत बांधण्यात आली नाही.

आठ वर्ष होऊनही नगरपालिकेने सदर स्मशानभूमीची जागा ताब्यात घेतली नाही दरम्यानच्या काळात समाजातील शिक्षित असलेले रवी एलगीरे यांनी महसूल विभाग व नगरपालिकेकडे वारंवार पत्र देऊन स्मशानभूमीच्या संरक्षण भिंत व तिथे होत असलेले अतिक्रमण संदर्भात पाठपुरावा केला.

मात्र गाढ झोपेत असलेल्या नगरपालिका प्रशासनाने सदर संवेदनशील विषयाची ही तसदी घेतली नाही. उलट सदर जागेवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नळ कनेक्शन, विद्युत पुरवठ्यासाठी ना हरकत,

तर अनेकांना शौचालय अनुदाना सारख्या सुविधा दिल्या पालिकेच्या या भूमिकेमुळे गोष्टी समाजात रोष निर्माण झाला.
 

(संपादन- विवेक मेतकर, अकोला)