संघटित शिकाऱ्यांची टोळी करीत होती जंगलामध्ये शिकार

Akola News: A gang of organized hunters was hunting in the forest
Akola News: A gang of organized hunters was hunting in the forest

हिवरखेड (जि. अकोला) :  हिवरखेड येथे काही अनोळखी व्यक्तींना संशयास्पदरित्या बंदुकीने पक्ष्यांची शिकार करताना आढळून आले. प्रत्यक्ष बघणाऱ्यांनी ही माहिती तत्काळ एका कर्तव्यदक्ष वनरक्षकाला दिली. त्यानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक संरक्षण दल यांनी कारवाई करीत पक्ष्यांची शिकार करणाऱ्या टोळीला बुधवारी अटक केली.


अकोट- तेल्हारा- सोनाळा या टी पॉइंट ढाब्याजवळ वनविभागाने सापळा रचून ही कारवा केली. या ठिकाणी दुपारी टाटा विंजर १४ सीटर वाहन क्रमांक एम एच १२ एम डब्ल्यू ८४१२ या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये वाहनचालक आणि दोन व्यक्ती आढळून आले. त्यांना विचारणा केली असता त्या व्यक्तींनी नावे मोहम्मद फैजल मोहम्मद इस्माईल, इम्तियाज अहमद नजीमोद्दिन अहमद, मोहम्मद इमरान मोहम्मद उस्मान, सर्व राहणार मालेगाव जिल्हा नाशिक असे सांगितले. सदर शिकाऱ्याकडे ६ रातवा पक्षी (नाईट जार), २ पारवा पक्षी (ब्लू रॉक पीजन), १ जंगली कबूतर (कोलार्ड डोव्ह) असे एकूण ९ पक्षी शिकार केलेल्या मृत अवस्थेमध्ये आढळून आले.

गाडीची तपासणी केली असता आरोपीकडून एक एअरगन, २५ छर्रे बुलेट, एक चाकू, एक बॅटरी, घटनास्थळावरून जप्त करण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट वन्यजीव विभाग आकोट अंतर्गत वनपरिक्षेत्र वान मधील परिवर्तुळ पूर्व झरी वनामध्ये त्यांनी या पक्षांची शिकार केली. वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक यांनी भारतीय वन अधिनियम तसेच वन्य जीव संरक्षण अधिनियमचे विविध कलमानुसार गुन्हे नोंदविण्यात आले.

सदर प्रकरणी पुढील तपास विश्वनाथ चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक संरक्षण दल हे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प एस एम रेड्डी, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. उपरोक्त कारवाईमध्ये सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे, वान रेंज चे वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण डी पाटिल, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक विश्वनाथ चव्हाण, वनपाल एम.सी. ठाकूर, वनरक्षक, सरंजू भारती, एम बी अंभोरे, कैलास चौधरी, इत्यादींनी सहभाग घेतला.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com