Akola News : रॅम्पवर चालली शेळी!

अकोटातील फॅशन शो ठरला लक्षवेधक; जेसीआय अकोटचे आयोजन
akola news
akola news sakal

अकोट - अकोट शहरात व्यक्तिमत्त्व विकास संघटना म्हणून गेले ४२ वर्षांपासून कार्यरत जेसीआयतर्फे ९ ते १५ सप्टेंबरपर्यंत जेसीआय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत बकरीचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. या आगळ्यावेगळ्या आयोजनाने अकोट शहरात तसेच अकोट तालुक्यातील शेळी पालकांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला.

या फॅशन शो मध्ये बकरीचे रॅम्प वॉक करत स्टेज वर आणण्यात आल्यात. सर्व बकऱ्यांना अतिशय नटून थटून त्याचे पालक घेऊन आले होते. यावेळी प्रत्येकानी सामाजिक संदेश देत ठुमकत ठुमकत प्रत्येक बकरीकडून रॅम्प वॉक करून घेत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या.

उद्‍घाटन प्रसंगी मंचावर अकोट शहर पोलिस स्टेशन ठाणेदार तपण कोल्हे, नंदकिशोर शेगोकार, कुणाल एंटरप्राईजेस चे संचालक मनोजजी वर्मा, नितीन शेगोकार, अतुल भिरडे, जेसीआय अकोट चे अध्यक्ष प्रवीण बनसोड उपस्थित होते. संचालन सप्ताह प्रमुख विनोद कडू,गोपाल गांधी, प्रास्ताविक स्मित पवार यांनी केले व आभार अभिषेक दुबे यांनी व्यक्त केले.

akola news
Akola : पूर्णेच्या पाण्याने राजराजेश्वराला जलाभिषेक

दिंडोकारांच्या शेळी ठरली फॅशन शोची विजेती

या फॅशन शो मध्ये तृतीय क्रमांक गणेश पारवे , द्वितीय क्रमांक मंगेश नाथे तर प्रथम क्रमांक प्रमोद दिंडोकार यांना जाहीर करण्यात आला. परीक्षक म्हणून बिपीन टावरी, प्रशांत खोडके, डॉक्टर तायडे यांनी धुरा संभाळली.

akola news
Akola Rain News : पावसाच्या आगमनाने पिकांना मिळाली नवसंजीवनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com