तळे राखी तो पाणी चाखी; कर्जमाफी योजनेचा लाभार्थी ठरला शासकिय कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

निसर्गाच्या अवकृपेने वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना घोषीत केल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

रिसोड (जि.वाशीम)  ः निसर्गाच्या अवकृपेने वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना घोषीत केल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

परंतु, शासनाचे नियम धाब्यावर बसवून रिसोड पंचायत समिती मधील वरिष्ठ लिपिकाने शासनाची दिशाभूल करून कर्जमाफी योजनेचा लाभ घेतल्यी तक्रार चाकोली येथील गजानन गरकळ यांनी संबंधिताकडे केली आहे.

शासनाच्या कर्जमाफीचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या या कर्मचाऱ्यावर काय कारवाई केल्या जाते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील चाकोली येथिल सेवासहकारी संस्थेचे सभासद आणि रिसोड पंचायत समिती मधील कार्यरत वरिष्ठ लिपिक रंगराव लहाणुजी गरकळ यांनी सन २०१२-१३ मध्ये सेवा सहकारी संस्थेंकडून सुमारे ४४ हजार ९०० रूपयांचे पीक कर्ज घेतले होते.

त्या रक्कमेचे व्याज २३ हजार ९० रूपये इतके झाले. आशा प्रकारे एकूण ६७ हजार ९९० रूपये झाले. त्यानंतर सन २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना जाहीर झाली.

यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट असतांना सुद्धा पंचायत समिती मधील कार्यरत वरिष्ठ लिपीक रंगराव लाहणुजी गरकळ यांनी स्वतः कर्जमाफीचा लाभ मिळण्याठी अर्ज करून अंगठा लावून कर्ज माफीचा लाभ घेतला. सदर प्रकार हा शासनाची दिशाभूल करून गरकळ यांनी सुमारे ६७ हजार ९९० रूपये रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ घेतला.

आशा प्रकारची तक्रार गजानन गरकळ यांनी साहाय्यक निबंधक सहकारी संस्था रिसोड, जिल्हा उपनिबंधक वाशीम व विभागीय सहनिबंधक अमरावती यांच्याकडे केली आहे. गरजानन गरकळ यांनी दुसऱ्यांदा रिसोड येथिल साहाय्यक निबंधक सहकारी संस्थेकडे तक्रार करून शासनाच्या कर्जमाफीचा लाभ घेणारे वरिष्ठ लिपिक रंगराव गरकळ यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

योग्य कारवाई नाही झाल्यास अमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्याने प्रशासन चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

परिसरात चर्चांना ऊधान
शासनाच्या अनेक योजना शेतकरी हिताच्या आसतात परंतु, अनेकवेळा शेतकऱ्यां पेक्षा चार वर्ग शिकलेले शासकीय कर्मचारीच शासनाची दिशाभूल करून अनेक योजनांचा लाभ घेतात. आशा प्रकारे रिसोड तालुक्यातील चाकोली येथिल रंगराव लहाणुजी गरकळ हे रिसोड पंचायत समितीमध्ये वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आसतांना शासनाच्या शेतकरी कर्ज माफीचा लाभ घेणारा कर्मचारीच ‘घरका भेदी लंका जाये’ ठरल्याची चर्चा रंगत आहे.
 
या  कर्मचाऱ्याने सन २०१७-१८ मध्ये शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतल्याचे चौकशी दरम्यान सिद्ध झाले आहे. प्रथम कर्जाच्या रक्कमेची व्याजासह भरणा करून नंतर सदर व्यक्तीवर नियमानुसार कारवाई केल्या जाईल.
-एम.बी.बन्सोडे, साहाय्यक निबंधक सहकारी संस्था, रिसोड.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Government employee took advantage of debt waiver scheme