
शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी वर्गाने रंगीबेरंगी कपडे किंवा टि शर्ट, जिन्स घालून कर्तव्यावर येणे ही बाब लोकप्रतिच्या नजरेने योग्य नाही. किंवा सर्वसामान्यांना अधिकारी, कर्मचारी वर्गाची ओळख होण्यास बाधा येत आसल्याने आता शासकीय अधिकारी-कर्मचारी वर्गाने आपली वेशभूषा कार्यालयास किमान अनुमान ठरेल आशा प्रकारे परिधान करण्याचे नुकतेच परीपत्रक काढल्याने कर्मचारी वर्गात आता कही खुषी कही गम दिसत आहे.
रिसोड (जि.वाशीम) : शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी वर्गाने रंगीबेरंगी कपडे किंवा टि शर्ट, जिन्स घालून कर्तव्यावर येणे ही बाब लोकप्रतिच्या नजरेने योग्य नाही. किंवा सर्वसामान्यांना अधिकारी, कर्मचारी वर्गाची ओळख होण्यास बाधा येत आसल्याने आता शासकीय अधिकारी-कर्मचारी वर्गाने आपली वेशभूषा कार्यालयास किमान अनुमान ठरेल आशा प्रकारे परिधान करण्याचे नुकतेच परीपत्रक काढल्याने कर्मचारी वर्गात आता कही खुषी कही गम दिसत आहे.
नुकताच एका सोशल मीडिया गृपवर एक संदेश पाहण्यात आला ‘जिन्स-टी शर्ट’ विकणे आहे. प्रारंभी हा विषय हस्यकल्लोळाचा ठरला परंतु, याची अधिक माहिती घेतली आसता म्हणे शासणाने आता शासकिय अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांनी आपली वेशभूषा किमीन अनुमान ठरेल आशा प्रकारचे परीत्रक काढल्यानेच सदरचा संदेन व्हायरल झाल्याची खातरजमा झाली. विविध शासकीय कार्यालयामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, नगरसेवक, नागरिक विविध कामासाठी भेटी येतात.
परंतु, अनेकदा अधिकारी, कर्चारी हे जिन्स टि शर्ट सारख्या वेशभूषेत असतात. त्यामुळे अनेकदा शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख होण्यास अडचणी येतात. त्यामुळे शासणाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचारी वर्गाने यापुढे शोभनीय पेहराव करावा यामध्ये शर्ट-पॅन्ट, ट्राउझर, पॅन्ट आसा पेहराव करावा. तर महिला कर्मचारी वर्गाने साडी, सलवार, चुडीदार कुर्ता आसा पहेराव करावा. गडद रंगाचे कपडे किंवा चित्र विचित्र कपड्याचा वापर करू नये आशा प्रकारच्या अधिसूचना सदर परीपत्रकात नमुद आहेत.
तसेच पुरूष अधिकारी-कर्मचारी वर्गाने पायामध्ये बुट किंवा शांडल वापरने बंधन कारक आसतांना स्लिपर चप्पल घालण्यास मनाई केली आहे. शासनाच्या परीत्रकातील या नव्या नियमाने कुठल्याही कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख सर्वसामान्य नागरिकांना सहज होईल. परंतु, यापूर्वी अनेक अधिकारी-कर्मचारी वर्गाकडे जिन्स टि-शर्ट घेतलेले आहेत त्याचे काय करावे ? यासाठी अनेक सोशल मीडिया गृपवर ‘टि-शर्ट, जिन्स’ विकणे आहे. आशा प्रकारचे उपरोधिक संदेश पाहावयास मिळत आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)