विरोधात असूनही विकास करण्याची उमेद- देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 24 November 2020

विरोधी पक्षात आमदार म्हणून असताना निधी मिळणे तर कधीच आहे. त्यातही आता हे आघाडीचे तिघाडी सरकार असल्यामुळे समन्वयाचा मोठा अभाव आहे.

चिखली (जि.बुलडाणा) : विरोधी पक्षात आमदार म्हणून असताना निधी मिळणे तर कधीच आहे. त्यातही आता हे आघाडीचे तिघाडी सरकार असल्यामुळे समन्वयाचा मोठा अभाव आहे.

परंतु, संषर्घ आणि जिद्दीच्या जोरावर निधी आणून चिखली मतदार संघाची वाटचाल नक्कीच चांगली आहे. अंगी काही करण्याची उमेद असली तर विरोधात असूनही विकास वाट मिळते हे आमदार श्‍वेता महाले यांनी सिद्ध केल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

श्‍वेता महाले यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर एक वर्षाचा कार्यकाळ आज पूर्ण झाला. त्यानिमित्ताने आ.महाले यांनी वर्षभरात केलेल्या कार्याच्या ई-पुस्तिकेचे प्रातिनिधिक स्वरूपात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सरकार बनविण्याच्या गोंधळात दोन महिने गेले .

हेही वाचा - प्रयोग फसला; 94 टक्के विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी ‘नो एन्ट्री’

त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाली. कसेबसे अनैतिक, अभद्र आघाडी तिघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना महामारीने सगळे जग ठप्प केले . पण आ. महाले गप्प न बसता लॉक डाऊन असतांना ही लोक सेवेत सतत कार्यरत राहिल्या. संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झालेली असतांना आणि त्यातही विरोधी पक्षात असल्याने काँग्रेसच्या तिघाडी सरकारमध्येच निधीची उपलब्धता करण्याची क्षमता नसल्याने काही विकास होईल याची शाश्वतीच नाही.

हेही वाचा -  अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

या विपरीत परिस्थितीत सुद्धा शक्य होईल तेव्हढे जनतेची विविध माध्यमातून कामे आणि सेवा करण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केला. खूप काही करण्याची उमेद , इच्छा आणि कौशल्य असतांना परिस्थितीमुळे जास्त करता आले नाही. परंतु फूल ना फुलांची पाकळी या प्रमाणे वर्षभर केलेल्या कार्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडल्या गेला पाहिजे म्हणून आ. महाले यांनी त्यांच्या कार्याचा वर्षपूर्ती अहवाल जनतेच्या समोर ठेवला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Hope for development despite opposition- Statement at Shweta Mahale office at Devendra Fadnavis, Chikhali