
मोदी सरकार किसन विरोधी,मोदी सरकार हाय हाय,नही चलेगी नही चलेगी मोदी 'तेरी ताना शाही नहीं चलेगी च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. पोलिसांनी कार्यकर्त्याना तहसीलच्या मुख्य द्वारावर अडवून निवेदन देणास सांगितले.
जळगाव जामोद (जि.बुलडाणा) : संपूर्ण भारतात अखिल भारतीय किसान सभेच्या समनव्य समितीने ३ डिसेंबर 2020 ला दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून केलेल्या आवाहनाला जळगाव जामोद तालुक्यातील प्रसेनजित पाटील यांचे नेतृत्वातील एल्गार संघटना व किसान ससभेच्या वतीने पंचायत समिती पासून तहसील कार्यालय पर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात गगन भेदी घोषणा देत तहसील कार्यालय समोर केंद्र सरकारच्या 3 शेतकरी विधायकांची होळी केली.
मोदी सरकार किसन विरोधी,मोदी सरकार हाय हाय,नही चलेगी नही चलेगी मोदी 'तेरी ताना शाही नहीं चलेगी च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. पोलिसांनी कार्यकर्त्याना तहसीलच्या मुख्य द्वारावर अडवून निवेदन देणास सांगितले.
एल्गार संघटनेच्या वतीने कॉ.विजय पोहनकर किसान सभेच्या वतीने कॉ. रामेश्वर काळे नी आंदोलनाचे नेतृत्व केले.यावेळी आदिवासी शेतकरी बांधव लहान मोठे व्यापारी वर्गातील सर्व जाती धर्मातील लोकांनी सहभाग घेतला होता.
शेकडो शेतकरी व एल्गारच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत दिल्ली येथील शेतकरी बांधवांना आमचा पाठींबा दिला.त्यावेळी विजय पोहनकर ह्यांनी दिल्ली येथे शाहिद झालेले शेतकरी गुरू बच्चन सिंग ह्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजीतदादा पाटील हे पणन महासंघांच्या बैठकीला असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना भ्रमनधानी वरून मार्गदर्शन केले.सर्व आंदोलनावर लक्ष ठेवत शांतपणे आंदोलन यशस्वीपणे पार पाडले.
आंदोलनात इरफान खान,आडोळ येथील गजानन पाटील,बंडू पाटील,राजू पाटील,संजय देशमुख,सुभाष कोकाटे,बाळु पाटिल डिवरे, आशिष वायझोडे,सिद्धार्थ हेलोडे,अनंता वाघ,अर्जुन भैड्या,भिल्लू भैड्या,ईमरान खान, निझाम राज, ताहेर माही,खालिद,नीलेश खुपासे,दत्ता डिवरे,आकाश जाने,साजिद,अब्दुल नसीम, योगेश भिसे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रमुख उपस्थिती मध्ये होते.