esakal | ८० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा आरक्षणाची सोडत; मुदत संपलेल्या ४३ ग्रामपंचायतीचा समावेश 
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Leaving reservation for Sarpanch post of 80 gram panchayats; Includes 43 expired Gram Panchayats

तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सिंदखेड राजा नगर परिषदेच्या हॉलमध्ये तहसीलदार सुनील सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीचा आयोजन करण्यात आले होते.

८० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा आरक्षणाची सोडत; मुदत संपलेल्या ४३ ग्रामपंचायतीचा समावेश 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

सिंदखेड राजा (जि.बुलडाणा) : तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सिंदखेड राजा नगर परिषदेच्या हॉलमध्ये तहसीलदार सुनील सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीचा आयोजन करण्यात आले होते.

सिंदखेड राजा शहरातील १० वर्षीय कु.ईश्वरी नितेश राठोड या लहान मुलीच्या हाताने ग्रामपंचायतीच्या लॉटरी पद्धतीने आरक्षण काढण्यात आले आहे.सिंदखेड राजा तालुक्यातील सन २०२० ते २०२५  होऊ घातलेल्या निवडणुकीचे आरक्षण तहसीलदार सुनील सावंत व नायब तहसीलदार प्रवीण लटके यांनी जाहीर केले.

सिंदखेड राजा तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण पुढील प्रमाणे उमनगांव सर्वसाधारण,राजेगाव सर्वसाधारण, कोनाटी नागरीकांचा मागास प्रवर्ग ,गोरेगाव सर्व साधारण , मोहाडी सर्वसाधारण, सोयदेव  सर्वसाधारण , वाघोरा सर्वसाधारण ,वरुडी नागरीकांचा मागास प्रवर्ग,आडगाव राजा  नागरीकांचा मागास प्रवर्ग, लिंगा (पांग्री काटे) सर्वसाधारण , धांदरवाडी सर्वसाधारण ,तांदुळवाडी सर्वसाधारण, जळगाव नागरीकांचा मागास प्रवर्ग ,रताळी सर्वसाधारण , पिंपळगाव सोनारा सर्वसाधारण ,जऊळका सर्व साधारण , वाघजाई सर्वसाधारण ,सवडत नागरीकांचा मागास प्रवर्ग, पिंपळगाव लेंडी सर्वसाधारण ,चांगेफळ सर्वसाधारण, राहेरी बुद्रुक  सर्वसाधारण ,सिंधी सर्वसाधारण ,पळसखेड चक्का नागरीकांचा मागास प्रवर्ग ,वडाळी सर्वसाधारण , निमगांव वायाळ सर्वसाधारण ,चिंचोली जहागीर सर्वसाधारण , हिवरा गड लिंग सर्वसाधारण ,किनगांव राजा सर्वसाधारण, धानोरा अनुसूचित जाती , सावखेड तेजन अनुसूचित जाती , साखरखेर्डा सर्वसाधारण, भंडारी सर्वसाधारण ,खामगांव अनुसूचित जाती , कंडारी अनुसूचित जाती , पांगरी उगले अनुसूचित जाती, हिवरखेड अनुसूचित जाती ,पिंपळखुटा अनुसूचित जाती ,शिवणी टाका अनुसूचित जाती, उमरद अनुसूचित जाती ,वरदडी बुद्रुक अनुसूचित जाती , दोरवी अनुसूचित जाती ,हनवतखेड (मलकापूर पांग्रा) अनुसूचित जाती ,आंबेवाडी अनुसूचित जाती , पोपळ शिवणी अनुसूचित जाती, कुंबेफळ अनुसूचित जाती , गारखेड अनुसूचित जाती , पिंपरखेड बु. अनुसूचित जाती ,नाईक नगर सर्वसाधारण, वसंतनगर सर्वसाधारण ,दत्तापूर सर्वसाधारण आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.

यावेळी नायब तहसीलदार प्रवीण लटके,पंकज मगर ,महसूल सहाय्यक शिवाजी पापुलवार, पुरुषोत्तम हांडे, जानकीराम शिपे, सुनील कुलकर्णी यांच्यासह महसूल कर्मचारी व तालुक्यातील नागरीक उपस्थित होते.

४३ ग्रामपंचायतीचा समावेश
सिंदखेड राजा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीची मुदत सप्टेंबर महिन्यामध्ये संपलेली असल्यामुळे सद्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक पाहत आहे.त्यामध्ये साखरखेर्डा, दुसरबीड, मलकापूर पांगरा,  किनगाव राजा , शेंदुर्जन, देऊळगाव कोळ, पिंपळगाव लेंडी, राहेरी बु, सोनोशी ,राजेगाव ,सायाळा, लिंगा,  उमनगाव , गोरेगाव ,पोफळ शिवणी, हिवरा ,गडलिंग, हनवतखेड, ढोरवी, आंबेवाडी, कुंबेफळ, कोनाटी,  कंडारी जागदरी, भंडारी , विझोरा, जळगाव, पळसखेड चक्का ,पिंपळखुटा, डावरगाव, भोसा, चिंचोली जहागीर ,धांदरवाडी, दत्तापूर वाघोरा, गारखेड , खामगाव, सुलजगाव ,हनवतखेड, महारखेड, पिंपरखेड बु, वसंतनगर ,नाईक नगर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image