esakal | चला सजवूया ‘माझी परसबाग’, घरच्या घरी भाजीपाला निर्मिती उपक्रमाला मिळणार प्रोत्साहन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Lets Decorate My Garden, Home-Based Vegetable Production

 आपण दररोज जो बाजारातील भाजीपाला खातो, तो पिकवण्यासाठी प्रचंड कीटकनाशकांचा वापर केला जातो. मात्र आपण करू तरी काय शकतो, असा विचार करून जे आहे, त्यात समाधान पावतो. पण विज्ञानाच्या या काळात त्यावरही मात करणं कठीण नाही, याची अनेक उदाहरणं आपल्या आजुबाजुला आहेत.

चला सजवूया ‘माझी परसबाग’, घरच्या घरी भाजीपाला निर्मिती उपक्रमाला मिळणार प्रोत्साहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : आपण दररोज जो बाजारातील भाजीपाला खातो, तो पिकवण्यासाठी प्रचंड कीटकनाशकांचा वापर केला जातो. मात्र आपण करू तरी काय शकतो, असा विचार करून जे आहे, त्यात समाधान पावतो. पण विज्ञानाच्या या काळात त्यावरही मात करणं कठीण नाही, याची अनेक उदाहरणं आपल्या आजुबाजुला आहेत.

फक्त याबाबत आपण अनभिज्ञ आहोत. ही उदाहरणं सर्वांसमोर आली तर, घरच्या घरी भाजीपाला निर्मिती उपक्रमाला प्रोत्साहन मिळू शकते आणि याच उद्देशातून जागर फाउंडेशनद्वारे ‘माझी परसबाग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी अकोलेकरांना आवाहन करण्यात आले आहे.


तसं पाहिलं तर जवळपास प्रत्येकाकडेच घराच्या आवारात, गच्चीवर किंवा बाल्कनीत एखादं झाड असतच. महिलांना याबाबत विशेष आवड असते. वेळात वेळ काढून अनेकजण त्यांच्या अंगणातील झाडांना वेळ देतात. लॉकडाउनच्या काळात तर, अनेकांनी त्यांची अंगणं हिरवीगार करत वेळेचा सदुपयोग केला.

त्यांचं हे वृक्षप्रेम फुलझाडांपलिकडे जाऊन त्यातून दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, बाजाराऐवजी परसबागेवर अवलंबून राहण्याची सवय लागावी आणि नवीन लोकांनी परसबागेकडे वळावे याकरीता परसबागेविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी जागर फाउंडेशनद्वारे अकोला शहर व पाच किलोमीटर परिसरातील गावातील परसबाग प्रेमींकरीता ‘माझी परसबाग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


दोन गटात होणार स्पर्धा
ही स्पर्धा ज्युनिअर गट (एक वर्षाआतील किंवा नवीन) व सिनिअर गट (एक वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असेलेली परसबाग) अशा दोन गटात होणार आहे 

(संपादन - विवेक मेतकर)

loading image