
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकता यांच्या असमान निधी योजने अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या माफत राबविण्यात येतात. त्यानुसार सन 2020-21 साठी असमान निधी योजनेतंर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध बाबींसाठी अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
बुलडाणा : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकता यांच्या असमान निधी योजने अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या माफत राबविण्यात येतात. त्यानुसार सन 2020-21 साठी असमान निधी योजनेतंर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध बाबींसाठी अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
ग्रंथालय सेवा देणार्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसाहाय्य, राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसाहाय्य, 50, 60,75, 100, 125 आणि 150 वे महोत्सवी वर्ष असल्यास हे वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसाहाय्य, राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसाहाय्य आणि बाल ग्रंथालय व राजा राममोहन ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसाहाय्य या योजनेतून देण्यात येते.
या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी संकेतस्थळावर संपर्क साधावा. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 8 जानेवारी 2021 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावे, असे आवाहन जिल्हा- ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे जिल्हा ग्रंथपाल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)