
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम प्रचंड रखडले असून बंद अवस्थेतील 'शकुंतले'च्या अरुंद फाटकाजवळील नादुरूस्त रस्त्यामुळे या महामार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी होत असून अपघातांची शक्यता बळावली आहे.
मूर्तिजापूर (जि.अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम प्रचंड रखडले असून बंद अवस्थेतील 'शकुंतले'च्या अरुंद फाटकाजवळील नादुरूस्त रस्त्यामुळे या महामार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी होत असून अपघातांची शक्यता बळावली आहे.
वाहनाची वर्दळ वाढली आहे. अचलपूर-यवतमाळ रेल्वे 'शकुंतला' फाटक अरुंद आहे. फाटकादरम्यान मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. जडवाहनांना फाटक पार करणे जिकरीचे होता आहे. अशा अडथळ्यांच्या शर्यतीत या महामार्गावर आज संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या.
'शकुंतला' फाटकाच्या एका बाजूला संभाजी चौक व दुसऱ्या बाजूला कंझरा टी पॉईंट आहे. या दोनन्ही चौकात मोठी वर्दळ असते.
या ठिकाणी शहरातून येणारे दोन्ही रस्ते पुर्णतः बंद होऊन राष्ट्रीय महामार्गापासून शहरा पर्यंत व राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या. वाहतूक विस्कळीत झाली. नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी या रेल्वे फाटकातील खड्डे बुजविण्याची मागणी केली होती व ती बेदखल राहिली, हे विशेष.
(संपादन - विवेक मेतकर)