
महाबीजच्या अकोला येथील गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेस, ॲग्रीकल्चर टुडे दिल्ली या समुहातर्फे ‘बेस्ट सीड टेस्टिंग लॅब इन पब्लिक सेक्टर’चा राष्ट्रीय स्तरावरील बहुमान नुकताच जाहीर झाला आहे.
अकोला : महाबीजच्या अकोला येथील गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेस, ॲग्रीकल्चर टुडे दिल्ली या समुहातर्फे ‘बेस्ट सीड टेस्टिंग लॅब इन पब्लिक सेक्टर’चा राष्ट्रीय स्तरावरील बहुमान नुकताच जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय/निमशासकीय तसेच खासगी कंपन्यांकडून विविध घटकांवर काम करणाऱ्या बाबींवर नामांकन मागविण्यात आले होते. तद्नंतर प्राप्त नामांकनमधून तज्ज्ञ निवड समितीच्या वतीने प्राप्त झालेल्या सादरीकरणाचा सर्वांगिण अभ्यास करून घटक निहाय पुरस्कार घोषित करण्यात आले. त्यामध्ये उपरोक्त पुरस्कारासाठी महाबीजची निवड केली. महाबीजच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेस यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने बियाणे अधिनियम १९६६ नुसार अधिसूचित केल्यामुळे ‘राज्य बियाणे प्रयोगशाळा’ म्हणून घोषित केले आहे. त्याप्रमाणे आयएसटीए या आंतररष्ट्रीय संस्थेचे सुद्धा सन २०१८ पासून सभासदत्व प्राप्त झाले असून, आयएसटीए ॲक्रीडेशनची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. महाबीजच्या प्रयोगशाळेस हा बहुमान मिळण्यामागे कुशल तांत्रिक मनुष्यबळ, अद्यावत उपकरणे तसेच तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्ता अंकेक्षण, प्रोफेसिअन्सी टेस्टमध्ये सलग समाधानकारक कामगिरी, उपकरणांचे प्रमाणीकरण इत्यादी बाबींचा प्रामुख्याने सहभाग असल्याचे महाबीज प्रशासनाकडून सांगण्यात आले. (संपादन - विवेक मेतकर) |
|||