esakal | हिवरखेडच्या मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ, राजकीय दाबावापोटी मतदार यादीत फेरफार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Massive confusion in Hivarkhed Gram Panchayat voter list, changes in voter list due to political pressure

हिवरखेड येथील मतदार यादीत प्रचंड घोळ झाल्याचे निदर्शनास येत असल्याने ह्या घोळास जबाबदार असणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

हिवरखेडच्या मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ, राजकीय दाबावापोटी मतदार यादीत फेरफार

sakal_logo
By
धीरज बजाज

हिवरखेड (जि.अकोला) ः हिवरखेड येथील मतदार यादीत प्रचंड घोळ झाल्याचे निदर्शनास येत असल्याने ह्या घोळास जबाबदार असणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

हिवरखेड ही अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून येथे  जवळपास 18 हजार मतदार आहेत. आणि गावची लोकसंख्या 40000 च्या वर आहे. येत्या 15 जानेवारी 2021 ला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून अनेक नागरिक राहतात वेगळ्याच प्रभागात तर त्यांचे मतदान भलत्याच प्रभागात बदलण्यात आले आहे. 


फक्त एवढेच नव्हे तर कुटुंबात सर्वजण सोबत राहत असलेल्या कुटुंबालाच विभक्त करण्याचे काम मतदार यादीद्वारे करण्यात येत आहे काय?? असा सवाल सुद्धा उपस्थित होत आहे. नवऱ्याचे नाव एका वार्डात तर बायकोचे नाव दुसऱ्याच वार्डात, आईचे नाव कुणीकडे तर वडिलांचे नाव कुणीकडे, असे गंभीर प्रकार मतदार याद्यांमध्ये पहावयास मिळत आहेत.


एका व्यक्तीने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की एका प्रभागातील गठ्ठा मतदान मिळावे म्हणून की काय जवळपास शेकडो मतदार वेगळ्या प्रभागातून एका प्रभागात ओढले गेले आहेत. सध्याच्या मतदार यादीची आकडेवारी पाहिली आणि मागील मतदार यादीशी याची तुलना केली की हा फरक स्पष्टपणे जाणवतो. 

विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वीच पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या त्या अगोदर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका सुद्धा पार पडल्या होत्या. त्यावेळी जवळपास सर्वांनीच आपण राहतो त्याच क्षेत्रातून मतदार यादी मध्ये नाव सुद्धा होते आणि मतदान सुद्धा केले होते. मग स्वतः मतदारांनी प्रभाग बदलण्याबद्दल विनंत्या न करता आणि आधीच नावे अचूक ठिकाणी असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात घोळ कसा केला गेला? कोणाच्या सांगण्यावरून केल्या गेला? की कोण्या राजकीय दबावाखाली केल्या गेला?  हा सर्वात मोठा प्रश्न आहे. संबंधीत अधिकाऱ्यांकडून यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मतदार करीत आहेत.


यामागे मोठे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.  म्हणून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चौकशी करून त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे प्रताप केले आहेत हे निष्पन्न होणे अत्यावश्यक आहे कारण हे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे एक प्रकारे हनन आहे. काही इतर गावातील व्यक्तींची नावे सुद्धा प्रारूप मतदार यादीत होते अशीही माहिती मिळाली होती. एकंदरीत मतदार यादी दुरुस्त करेपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका घेऊन काहीच अर्थ नाही. असा सूर सुद्धा मतदारांकडून उमटत आहे.


 मतदार यादीतील ह्या घोळाबाबत तहसीलदार राजेश गुरव यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत संबंधित तलाठ्याला विचारणा केली त्यावर दिनांक 1 ते 7 डिसेंबर पर्यंत प्रारुप मतदार यादी ग्रामपंचायत कार्यालय हिवरखेड येथे लावलेली होती. परंतु कोणीच आक्षेप घेतला नसल्याने प्रारुप मतदार यादीलाच अंतिम रूप देण्यात आल्याची माहिती संबंधित तलाठ्यांनी दिल्याचे तहसीलदारांनी सांगितले. परंतु 40000 जनसंख्येच्या गावातील 400 लोकांना सुद्धा या कार्यक्रमाबद्दल माहिती नाही. आणि ज्यांनी मागच्या वेळेस बरोबर ठिकाणी मतदान केले असतानाही त्यांची नावे भलत्याच प्रभागात जातील अशी शंका सुद्धा त्यांना कशी येणार?.  जर निवडणुकीपूर्वी मतदार याद्या दुरुस्त केल्या नाहीतर मतदानाच्या वेळी मतदारांची चांगलीच धांदल उडणार आहे एवढे मात्र निश्चित असून शासनाने याची गंभीर दखल घेणे नितांत गरजेचे आहे.


प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी
वॉर्ड क्र  महिला  पुरुष     एकूण
1         1630   1787   3417
2         1263   1460   2723
3         1291   1475   2766
4         1571   1729   3300
5         1334   1576   2910
6         1269   1486   2755
एकूण   8358   9513  17871

(संपादन - विवेक मेतकर)

loading image