अनलॉक पाचमध्ये तरी दार उघड देवा!

सुगत खाडे  
Tuesday, 29 September 2020

कोरोना संकटामुळे मार्चपासून बंद असलेली धार्मिक स्थळे भाविकांसाठी ऑक्टोबरमध्ये खुली करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करण्याची मागणी श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

अकोला : कोरोना संकटामुळे मार्चपासून बंद असलेली धार्मिक स्थळे भाविकांसाठी ऑक्टोबरमध्ये खुली करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करण्याची मागणी श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

कोरोनाचा कहर वाढतच असल्याने मंदिरे व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. केंद्र शासनाने अनलॉक तीन व चारमध्ये नियमांचे पालन करून धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

महाराष्ट्रात मात्र कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता येत्या १ ऑक्टोबरपासून अनलॉक पाचची नियमावली जाहीर करताना त्यात धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे.

येणारा काळ सण-उत्सवांचा
आगामी काळात दसरा-दिवाळीसारखे सण उत्सव साजरे होणार आहे. त्यापूर्वी नवरात्रोत्सवाचे आयोजन होईल. त्यासाठी धार्मिक स्थळे सर्व भाविकांसाठी नियमावली जाहीर करून सुरू करावी, अशी मागणीही आमदार शर्मा यांनी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: New rules for Corona Unlock in October; Attention of devotees to the decision of the government