शेताच्या विहिरीवर आला आवाज, बॅटरी फिरवली तर चोर फोडत होता सौर उर्जेच्या प्लेट्स

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 23 November 2020

शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगुळ झनक येथील शेतकरी सतीश बाजीराव नवघरे यांच्या शेतावर असलेले सौरऊर्जा प्लेट तोडफोड केल्याप्रकरणी आरोपी अनंता बबन नवघरे रा. मांगुळ झनक याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर (जि.बुलडाणा) ः शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगुळ झनक येथील शेतकरी सतीश बाजीराव नवघरे यांच्या शेतावर असलेले सौरऊर्जा प्लेट तोडफोड केल्याप्रकरणी आरोपी अनंता बबन नवघरे रा. मांगुळ झनक याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील फिर्यादी शेतकरी त्यांच्या गट क्रमांक १९२ मधील शेतामध्ये सिंचन करण्यासाठी अनुदानावर सौरऊर्जा पंप मिळालेला आहे. १४ नोव्हेंबरच्या रात्री फिर्यादीचे शेजारी गणेश रामचंद्र झनक हे रानडुकरे हाकण्यासाठी शेतावर हजर असताना त्यांना यांच्या विहिरीवर आवाज ऐकू आला.

हेही वाचा - शाळांची घंटी आजपासून वाजणार; पालकांची लेखी संमती आवश्यक

त्यांनी त्या दिशेला बॅटरी फिरवली असतात त्यांना त्या ठिकाणी आरोपी उभा असलेला दिसला. त्यांनी विहिरीवर जाऊन पाहले असता आरोपीने तेथून पळ काढला व सौरऊर्जाची प्लेट दगडाने तोडलेली दिसली.

हेही वाचा -  भाजप म्हणतेय, शाळा बंदच ठेवा; गरिबाच्या मुलांना मोफत स्मार्ट फोन द्या

फिर्यादीचे शेजारी यांच्या सांगण्यावरून शेतात जाऊन पाहिले असता सौरऊर्जाची प्लेट (अंदाजे किंमत २० हजार रुपये) तोडफोड केलेली दिसली.

हेही वाचा -  ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

फिर्यादीने तातडीने शिरपूर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. फिर्यादीवरून आरोपी अनंत बबन नवघरे विरुद्ध भादवि कलम ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Noise on field well, thief turns on battery, breaks solar energy plates