
शहरातील न्यू तापडीया नगर भागातील कुख्यात गुंड मोनु काकडची अज्ञात मारेकऱ्यांनी निघृन हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
अकोला : शहरातील न्यू तापडीया नगर भागातील कुख्यात गुंड मोनु काकडची अज्ञात मारेकऱ्यांनी निघृन हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
न्यू तापडीया नगर भागातीलरेल्वे उड्डाणपुलाजवळ एका निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळून आला. हत्येची माहिती मिळताच सिव्हील लाईन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गजानन उर्फ मोनू काकड हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.
हत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. न्यू तापडिया नगर परिसरातील रहिवासी मोनू काकड याच्यावर अज्ञात मारेकर्यांनी शुक्रवारी पहाटे धारदार शस्त्र व दगडाने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृतक मोनू काकड याची अपराधीक पार्श्वभूमी असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असलयाची माहिती आहे. जुन्या वैमानस्याहून ही हत्या झाली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांनी ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)