esakal | कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सूरू, शेतकऱ्यांचा चांगाल प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Online registration for sale of cotton begins, good response from farmers

विविध कारणांमुळे सीसीआयची रखडलेली कापूस खरेदी तसेच नवीन कापूस खरेदीसाठी सीसीआयच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कापूस विक्रीसाठी मलकापूर, मोताळा, नांदुरा भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सूरू, शेतकऱ्यांचा चांगाल प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मलकापूर (जि.बुलडाणा) ः विविध कारणांमुळे सीसीआयची रखडलेली कापूस खरेदी तसेच नवीन कापूस खरेदीसाठी सीसीआयच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कापूस विक्रीसाठी मलकापूर, मोताळा, नांदुरा भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्याअनुषंगाने गेल्या दोन दिवसात ९ हजाराच्यावर शेतकऱ्यांना आपला कापूस विक्रीसाठी ऑन नोंदणी करीत या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असल्याची माहिती कृ.उ.बा.स.चे मुख्य प्रशासक डॉ.अरविंद कोलते यांनी दिली.


मागील हंगामात कोरोनाची पाश्र्वभूमि तसेच विविध तांत्रिक अडचणींमुळे ऑफलाईन, ऑनलाईन नोंदणी करून सुध्दा बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झाला नव्हता.

तेव्हा सीसीआयने कापूस खरेदी नियोजन केल्याने मलकापूर, मोताळा, नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सीसीआय खरेदी करणार आहे. त्याकरीता १५ नोव्हेंबरपासून ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

गेल्या दोन दिवसात तिन्ही तालुक्यातून ९ हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीकरीता ऑनलाईन नोंदणी केली असल्याचे डॉ.अरविंद कोलते यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी या ऑनलाईन प्रक्रियेत नाव नोंदणी करून आपला कापूस विक्रीसाठी आणण्याचे आवाहन कृउबासच्या वतीने करण्यात आले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)