
राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणासाठी बाळापूर तालुक्यातील संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा भिखुंडखेड, बाभुळखेड, गाजीपूर तीन गावांमधील शेतकऱ्यांना किती वाढीव माेबदला मिळाला, यासंबंधीचे चित्र मंगळवारी (ता. १ डिसेंबररोजी) स्पष्ट हाेणार आहे. दरम्यान सध्या सहा गावातील १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची प्रकरणं प्रलंबितच आहेत.
अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणासाठी बाळापूर तालुक्यातील संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा भिखुंडखेड, बाभुळखेड, गाजीपूर तीन गावांमधील शेतकऱ्यांना किती वाढीव माेबदला मिळाला, यासंबंधीचे चित्र मंगळवारी (ता. १ डिसेंबररोजी) स्पष्ट हाेणार आहे. दरम्यान सध्या सहा गावातील १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची प्रकरणं प्रलंबितच आहेत. अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे चाैपदरीकरणाचे काम गत अनेक वर्षांपासून सुरू आहे. या कामासाठी बाळापूर तालुक्यासह इतरही ठिकाणच्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. मात्र या भूसंपादनाचा अल्प माेबादला मिळाला असून, माेबादला देताना भेदभाव करण्यात येत असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला. वाढीव-येाग्य ताे माेबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय यंत्रणांचे उंबरठे झिजवले. मात्र त्यांना अपेक्षितनुसार माेबदला मिळाला नव्हता. दरम्यान या प्रकरणी कीटकनाशक प्राशन केलेल्या आणि त्यांच्यासाबेत असलेल्या शेतकऱ्यांनी भूसंपादन माेबदल्यात झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला हाेता. माेबदला म्हणून काहींना प्रती गुंठा तब्बल साडे सहा, आठ लाख रुपये दराने रक्कम मिळाली. मात्र आम्हाला दाेन हजार-दाेन हजार ७०० ते १० हजार रुपये प्रती गुंठा दराने रक्कम मिळाली, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे हाेते. वाढीव माेबदला मिळावा, यासाठी वारंवार प्रशासकीय यंत्रणांना वारंवार निवेदने दिली हाेती.
गत आठवड्यात दिला आदेश (संपादन - विवेक मेतकर) |
|||