
प्रधानमंत्री पीक विमा योजना रबी हंगाम वर्ष २०२०-२१ मध्ये राबविण्यात येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हफ्त्यासह आपले प्रस्ताव १५ डिसेंबरपर्यंत सादर करावे. कर्जदार शेतकरी पीक विमा काढण्यास इच्छुक नसल्यास त्या शेतकऱ्यांनी लेखी अर्ज बँकेस सादर करावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले.
बुलडाणा : प्रधानमंत्री पीक विमा योजना रबी हंगाम वर्ष २०२०-२१ मध्ये राबविण्यात येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हफ्त्यासह आपले प्रस्ताव १५ डिसेंबरपर्यंत सादर करावे. कर्जदार शेतकरी पीक विमा काढण्यास इच्छुक नसल्यास त्या शेतकऱ्यांनी लेखी अर्ज बँकेस सादर करावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून, कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
या योजने अंतर्गत विमा हप्ता दर ३० टक्के पेक्षा जास्त नमुद केला आहे. त्यासाठी वाढीव विमा हप्ता अनुदान भार राज्य शासनावर आकारण्यात येणार असून शेतकर्यांवरील विमा हत्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा रब्बी हंगामासाठी १.५० टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगाम सन २०२०-२१ ते २०२०-२३ या तीन वर्षाकरिता जोखिमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
विमा क्षेत्र घटक ही योजना क्षेत्र हा घटक धरून राबविण्यात येणार असून, पीक विमा निहाय अधिसुचित विमा क्षेत्र घटक म्हणजेच मंडळ किंवा गट आणि तालुका किंवा तालुका गट राहणार आहे.
या योजनेअंतर्गत पिक कापणी प्रयोगाव्दारे मिळणारे उत्पन्नाचे अंदाज हे अचुक व दिलेल्या कालमर्यादेमध्ये प्राप्त करण्याकरीता उपग्रहाव्दारे प्राप्त प्रतिमांच्या साहाय्याने पिक कापणी प्रयोग आयोजित करणे, तसेच पिकांच्या मिळणारे उत्पन्नाचे अंदाजासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणेबाबत केंद्र शासनाने सूचित केले आहे.
या वर्षीच्या रब्बी हंगाम सन २०२०-२१ मध्ये पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकर्यांनी सहभागी होऊन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, यांनी केलेले आहे.
(संपादन - विवेक मेतकर, अकोला)