सत्ताधाऱ्यांना तारीख; स्थगिती कायम, पुढील महिन्यात होणार युक्तीवाद

सुगत खाडे  
Wednesday, 30 September 2020

 जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत वेळेवरच्या ठरावांविरोधात शिवसेच्या वतीने विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणाची मंगळवारी (ता. २९) विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होती. परंतु काही कारणांमुळे सदर सुनावणी लांबणीवर गेल्याने सत्ताधाऱ्यांना ६ ऑक्टोबर तारीख देण्यात आली आहे. असे असले तरी यापूर्वी स्थगिती देण्यात आलेल्या विषयांवर स्थगिती पुढील तारखेपर्यंत कायम राहणार आहे.

अकोला : जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत वेळेवरच्या ठरावांविरोधात शिवसेच्या वतीने विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

सदर प्रकरणाची मंगळवारी (ता. २९) विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होती. परंतु काही कारणांमुळे सदर सुनावणी लांबणीवर गेल्याने सत्ताधाऱ्यांना ६ ऑक्टोबर तारीख देण्यात आली आहे. असे असले तरी यापूर्वी स्थगिती देण्यात आलेल्या विषयांवर स्थगिती पुढील तारखेपर्यंत कायम राहणार आहे.

जिल्हा परिषदेची १४ सप्टेंबर रोजी ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सत्ताधाऱ्‍यांनी (वंचित बहुजन आघाडी) शिवसेनेने कडून आलेले पाणी पुरवठ्याचे दोन ठराव प्रलंबित ठेवले होते.

त्यासह रस्त्यांची ३३ कामे रद्द करुन केवळ तीनच कामे करण्याचा उपसचिवांचा आदेश सुद्धा रद्द करण्याचा ठराव मंजुर केला होता. याव्यतिरीक्त वेळेवरच्या विषयांच्या मंजुरीचा धडाका लावत १६ विषयांना मंजुरी दिली होती.

सदर प्रकारानंतर विरोधकांनी सभेचे सचिव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांची भेट घेत आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सीईओंकडे सुद्धा तक्रार केली होती. इतक्यावर न थांबता विभागीय आयुक्तांकडे या विषयी तक्रार दाखल केली होती.

त्यावर मंगळवारी (ता. २९) सुनावणी होणार होती. परंतु काही कारणांमुळे सदर सुनावणी लांबणीवर गेल्याने आता या प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Postponement maintained, arguments to be held next month