लक्ष्मीपूजन अंधारात, भारनियमाने दिवाळी काळोखली!, 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच विद्युत पुरवठा गेल्याने नागरीकांना कमालीचा मानसिक त्रास सहन करावा लागता. दिवाळी हा दिपोत्सवाचा सण...फटाक्याच्या रंगबेरंगी छटांनी आसमंत उजाळून निघून जाणार सण..

हिवरा आश्रम (जि.बुलडाणा) ः ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच विद्युत पुरवठा गेल्याने नागरीकांना कमालीचा मानसिक त्रास सहन करावा लागता. दिवाळी हा दिपोत्सवाचा सण...फटाक्याच्या रंगबेरंगी छटांनी आसमंत उजाळून निघून जाणार सण..

.मात्र या दिवाळी सणात सततच्या भारनियमाने हिवरा आश्रम परिसरातील नागरिकांची दिवाळी अंधारात जात आहे. दिवाळीच्या सणात सुध्दा पहाटे पाच वाजता तर कधी रात्री विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजन पडत आहे. ऐन दिवाळीच्या सणात घरात अंधाराचे साम्राज्य पसरल्यामुळे दिवाळी काळोखात जात असल्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

दिवाळी सणात सुध्दा महावितरण विभागाकडून विद्युत भारनियमान सुरू असल्यामुळे नागरीकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. महावितरण विभागाकडून विद्युतचे योग्य नियोजन करण्यात येत नसून महावितरण विभागाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुढे आला आहे.

दिवाळी सणात सुध्दा विद्युत वितरण कंपनीकडून सुरळीत विद्युत पुरवठा होणे अपेक्षित होते मात्र वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा नागरिकांची डोके दुःखी ठरत आहे.

अगोदच महावितरण कडून ज्याचा वीज बिलाची आकारणी होत असून, त्याच दिवाळी सारख्या महत्त्वाच्या सणाला विजेच्या लपंडावाची भर पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. महाविरतण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून नागरिकांना होणारा मनस्ताप थांबवावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरीत आहे.

हिवरा आश्रम परिसरात गेल्या काहि दिवसांपासून सतत महावितरण विभागाकडून विद्युत जाणे येणे होत असल्यामुळे व्यावसायिकांसह नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. दिवाळी सणात विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

खंडीत वीजपुरवठयाने मानसिक त्रास
ऐन दिवाळीच्या सणासुदीला सतत होणारा खंडीत विद्युत पुरवठयामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवाळीच्या सणाला विद्युत सुरळीत चालू राहावी अशी अपेक्षा नागरीकांची होती मात्र खंडीत वीजपुरवठ्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Power outage on Diwali day at Hivara Ashram, Lakshmi Pujan in the dark