शेतकऱ्यांच्या कापसाला ५ हजार ६२५ रुपये प्रति क्विंटल भाव

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 24 November 2020

 कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात यंदाच्या हंगामात खासगी कापूस खरेदीला आज (ता.२३) पासून सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या कापसाला ५ हजार ६२५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) :  कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात यंदाच्या हंगामात खासगी कापूस खरेदीला आज (ता.२३) पासून सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या कापसाला ५ हजार ६२५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडून अद्याप पर्यंत कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला नाही. परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांकडे कमी भावात कापूस द्यावा लागत होता.

हेही वाचा - प्रयोग फसला; 94 टक्के विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी ‘नो एन्ट्री’

समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदी सुरू करण्यात यावी अशी मागणी तालुका व परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी करीत होते.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

दरम्यान बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक एस.यु जगदाळे यांच्या हस्ते पहिल्या वाहनाचे कापूस उत्पादक शेतकरी राधाकिसन गोविंद मांटे राहणार सिनगाव जहागीर यांना रुमाल टोपी देऊन सन्मान करण्यात आला.

हेही वाचा - VIDEO: प्रेरणादायी: भिंती बोलू लागल्या! आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी कहाणी

त्यांच्या कापसाला नमन कॉटनचे मनीष अग्रवाल यांनी लिलावाद्वारे ५ हजार ६२५ प्रति क्विंटल भाव दिला शेतकर्‍यांनी मास्क लावून आपली वाहने ठराविक अंतरावर उभी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

याप्रसंगी बाजार समितीचे सचिव किशोर म्हस्के, कापूस व्यापारी सन्मती डोणगावकर, मनीष अग्रवाल, यजू धन्नावत, विशाल रायबागकर, बबलू सेठ यांच्यासह कापूस उत्पादक शेतकरी यांची उपस्थिती होती.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: The price of cotton at Deulgaon Raja is Rs. 5,625 per quintal