
भावाच्या भेटीकरिता जात असताना शितल ट्रॅव्हल्सने दुचाकीस धडक दिल्याने पती-पत्नी ठार झाल्याची घटना ता. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते ९.१५ वाजेच्या सुमारास खामगाव-शेगाव मार्गावरील हॉटेल पुण्याईजवळ घडली.
खामगाव (जि.बुलडाणा) : भावाच्या भेटीकरिता जात असताना शितल ट्रॅव्हल्सने दुचाकीस धडक दिल्याने पती-पत्नी ठार झाल्याची घटना ता. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते ९.१५ वाजेच्या सुमारास खामगाव-शेगाव मार्गावरील हॉटेल पुण्याईजवळ घडली.
चांदमारी परिसरातील रहिवाशी विजय दत्तु सारस्कर (वय ४०) हे भावाच्या भेटीकरिता पत्नी सुलोचना सारस्कर (वय ३५) व मुलगा सुकेश सारस्कर (वय १२) यांचेसह खामगाव- शेगाव मार्गावरील शामल नगरकडे जात होते.
दरम्यान, शेगावकडून येणाऱ्या शितल ट्रॅव्हल्स (क्रमांक एमएच ३० एए ९९९५) च्या चालकाने विजय सारस्कर यांच्या एमएच २८ एफ ८१६८ या दुचाकीस हॉटेल पुण्याईजवळ जोरदार धडक दिली. या धडकेत विजय दत्तू सारस्कर व पत्नी सुलोचना सारस्कर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मुलगा सुकेश सारस्कर हा जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच शहर पो.स्टे.चे ठाणेदार सुनील अंबुलकर, पोलिस कर्मचारी तराळ, कांबळे यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलवून दोन्ही मृतकांचे मृतदेह येथील सामान्य रूग्णालयात पाठविले.
(संपादन - विवेक मेतकर)