esakal | ग्रामीण भागात वाढतेय पल्स ऑक्सिमीटरची क्रेझ !
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Pulse oximeter craze in rural areas!

ग्रामीण भागातसुध्दा कोरोनाचा आजार होवू नये यासाठी तोंडाला मास्क, सॅनिटाईझर यांचा वापर करताना नागरिक दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागात भिती पोटी का होईना पण खबरदारी घेतली जात आहे. त्यातूनच ग्रामीण भागात घरच्या घरी ऑक्सिजनची पातळी तपासण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात वाढतेय पल्स ऑक्सिमीटरची क्रेझ !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

हिवरा आश्रम (जि.बुलढाणा)  : ग्रामीण भागातसुध्दा कोरोनाचा आजार होवू नये यासाठी तोंडाला मास्क, सॅनिटाईझर यांचा वापर करताना नागरिक दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागात भिती पोटी का होईना पण खबरदारी घेतली जात आहे. त्यातूनच ग्रामीण भागात घरच्या घरी ऑक्सिजनची पातळी तपासण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.


कोरोना विषाणूच्या संकटाने संपूर्ण जग हादरून गेले. कोरोनावरील लस लवकरात लवकर निघावी, अशी लोकांना अपेक्षा आहे. कोराना विषाणूच्या दशहतीखाली प्रत्येक जण आहे. साधा सर्दी, खोकला व ताप आला तरी आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग तर झाला नसेल ना अशी शंका अनेकांच्या मनात चुकचुकल्या शिवाय राहत नाही.

गेल्या काही दिवसांपासून शहरासोबत ग्रामीण भागात सुध्दा कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मेहकर तालुक्यात ४९३ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने नागरिकांकडून मास्कबरोबर, सॅनिटाझर, पल्स ऑक्सिमीटर, वेपोरायझर यांची खरेदी वाढली आहे. पल्स ऑक्सिमीटर हे अत्यंत छोटे यंत्र असून, पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजता येते. 

शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजता येत असल्यामुळे पल्स ऑक्सिमीटरच्या मागणी वाढ झाली आहे. ग्रामीण भागाती व्यापारी, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, महाविद्यालये, संस्था व सर्वसामान्य नागरिकांकडून पल्स ऑक्सिमीटरचा वापरा केला जात आहे.


पल्स ऑक्सिमीटरने ९५ पेक्षा खाली लेवल गेल्यास ६ मिनिटे चालून पुन्हा दोनवेळा तपासावे जर ९५ पेक्षा कमी भरल्यास व आणि सर्दी, ताप, खोकला व अशक्तपणा अशी लक्षणे असल्यास लगेच नजिकच्या आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- डॉ. उमेश निमदेव, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी, मेहकर

(संपादन - विवेक मेतकर)