जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच रविकांत तुपकरांचा ठिय्या

Akola News: Ravikant Tupkar sits in front of Buldana District Collectors office
Akola News: Ravikant Tupkar sits in front of Buldana District Collectors office

बुलडाणा  : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम त्वरित जमा करण्यात येईल असे आश्वासन राज्य सरकारने शेतकर्‍यांना दिले होते. मात्र, सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे जो पर्यंत उर्वरित रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात तत्काळ जमा होणार नाही, तो पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहील अशी आक्रमक भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर आज (ता.२४) सकाळी ११ वाजेपासून शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.


जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची भेट घेऊन रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात चर्चा केली. तथापि उर्वरित रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात केव्हा जमा होईल या संदर्भात शासनाचे कोणतेही निर्देश नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितल्यामुळे तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरच शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदनही पाठविले असून, या निवेदनात म्हटले आहे की, बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.

मदत दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल अशी ग्वाही दिली होती. परंतु, मदत खात्यावर जमा झाली नाही. काही शेतकऱ्यांना मदत मिळाली परंतु, अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहे. त्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यात यावी. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनचे एकरी एक-दोन पोते उत्पादन झाले आहे.

परंतु ते शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना मदत मिळणे करिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अतिशय तोकडी आहे. या मदतीने शेतकर्‍यांचे काहीही होणार नाही. त्यामुळे अधिकच्या मदतीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा व जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने आणेवारी काढली आहे.

तरी अंतिम आणेवारी काढताना वस्तुनिष्ठ आणेवारी काढण्यात यावी. या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी शेतकर्‍यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या ठिय्या आंदोलनात राणा चंदन, शे.रफिक शे. करीम, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, ज्ञानेश्वर कल्याणकर, सय्यद वसीम, महेंद्र जाधव, राजेश गवई, दत्ता पाटील, विजय बोराडे,कडूबा मोरे, रामेश्वर पवार, रामेश्वर अंभोरे, आकाश माळोदे, गजानन गवळी,मारोती मेढे,जबिर खान,मनोहर उमाळे, वसुदेव मेढे, लवेश उबरहंडे यांच्यासह शेतकरी व ’स्वाभिमानी’चे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.


दालनासमोरच खाल्या आंदोलकांनी भाकरी
सकाळपासून चालू असलेल्या आंदोलनाचा उशिरा पर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनासमोरच ठेचा- भाकर खाऊन आंदोलन सुरूच ठेवले. तर जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या अनेकांनी ठेचा- भाकरींचा आस्वाद घेतला. या आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधले.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com