esakal | आता नोकर भरती नाही; संस्था आणि ठेकेदारांकडून करुन घेणार काम
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Recruitment scissors; Work to be done by external organizations

नोकर भरतीला कात्री लागली असून सदर काम बाह्ययंत्रेकडून करुन घेताना पदवीधर अंशकालीन उमेदवारांनाच सर्वात आधी संधी देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे अंशकालीन उमेदवारांना संधी मिळणार असली तर इतर बेरोजगारांना मात्र त्याचा फटका बसणार आहे.

आता नोकर भरती नाही; संस्था आणि ठेकेदारांकडून करुन घेणार काम

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला  ः प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी शक्य असेल त्या ठिकाणी पदनिर्मिती न करता, सहजरित्या जी कामे बाह्ययंत्रणेकडून करुन घेता येतील अशी कामे बाह्ययंत्रणेकडून (संस्था, ठेकेदार) करुन घेण्याचे धोरण शासनाने अंगीकारले आहे.

त्यामुळे नोकर भरतीला कात्री लागली असून सदर काम बाह्ययंत्रेकडून करुन घेताना पदवीधर अंशकालीन उमेदवारांनाच सर्वात आधी संधी देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे अंशकालीन उमेदवारांना संधी मिळणार असली तर इतर बेरोजगारांना मात्र त्याचा फटका बसणार आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या तरुणांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. रोजगार मेळाव्यात हजाराे तरुण हजेरी लावत असल्याने जिल्ह्यात बेरोजगारीचा ‘पूर’ आल्याचे स्पष्ट हाेत आहे. नाेकरी मिळावी यासाठी बेराेजगार शासकीय कार्यालयातील रिक्त जागांसाठी अर्ज करत आहेत. परंतु जागा कमी व अर्जदारांची संख्या अधिक असल्यामुळे निवडक तरुणांनाच राेजगाराचे साधन उपलब्ध हाेत आहे.

परिणामी जिल्ह्यात नाेंदणीकृत बेराेजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान बेरोजगारी कमी करण्यासाठी लाखो तरुण शासकीय भरती प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहत आहेत. परंतु शासनाने प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा यासाठी शक्य असेल त्या ठिकाणी पदनिर्मिती न करता, कामे बाह्ययंत्रणेकडून (संस्था, ठेकेदार) करुन घेण्याचे धोरण शासनाने अंगीकारले आहे.

त्यामुळे नोकर भरतीला कात्री लागणार असून ज्या ठिकाणी नोकर भरती करण्यात येईल त्या जागी सुद्धा पदवीधर अंशकालीन उमेदवारांना प्रथम संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे कत्रांटी पदावर सुद्धा बेरोजगार उमेदवारांना काम मिळेल याची शाश्वती कमी झाली आहे.


काय आहे शासनाच्या आदेशात
- राज्य शासनाच्या व शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयीन आस्थापनेवर तसेच शासन अनुदानित संस्थांमध्ये व राज्यभरात पीपीपी तत्वावर सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये ज्या पदांच्या सेवा बाह्यसंस्थेकडून घेण्यात येतात अशा लिपीक, टंकलेखक, शिपाई, वाहन चालक यासारख्या पदांच्या सेवा अंशकालीन उमेदवारांकडून घेण्यात याव्या.
- बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेताना, पदवीधर अंशकालीन उमेदवारांया यादीत योग्य शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास अन्य बाह्ययंत्रणेकडून सेवा घ्यावात.
- बाह्ययंत्रणेकडील कर्मचाऱ्यांचे कोणतेही उत्तरदायित्व शासनावर येणार नाही, याची दक्षता घ्यावी.

(संपादन - विवेक मेतकर)