अहवालासह रुग्णही घटले; आता १९८ रुग्णच ॲक्टिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 6 November 2020

कोरोना विषाणू संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. ५) जिल्ह्यात ११७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८ अहवाल पॉझिटिव्ह तर १०९ अहवाल निगेटिव्ह आले.

अकोला  ः कोरोना विषाणू संसर्गाचा धोका जिल्ह्यात कमी होत असतानाच कोरोना अहवालांची संख्या सुद्धा घटली आहे. कोरोनाचे अहवाल गुरुवारी (ता ५) घटल्यामुळे नव्या रुग्णात आठचीच भर पडली. त्यामुळे आता जिल्ह्यात १९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. परिणामी आरोग्य यंत्रणेवरिल ताण हलका झाला आहे.

कोरोना विषाणू संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. ५) जिल्ह्यात ११७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८ अहवाल पॉझिटिव्ह तर १०९ अहवाल निगेटिव्ह आले.

संबंधित रुग्णांमध्ये पाच महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर येथून दोन, तर उर्वरित अदलापूर ता. अकोट, वृंदावन नगर, जामठी ता. मूर्तिजापूर, माधव नगर, रामदास पेठ व तेल्हारा येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. याव्यतिरीक्त गुरुवारी (ता. ५) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून चार तर स्कायलार्क हॉटेल येथून तीन अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- एकूण पॉझिटिव्ह - ८४९५
- मृत - २८२
- डिस्चार्ज - ८०१५
- ॲक्टिव्ह रुग्ण - १९८

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: With the report, the number of patients also decreased; Now only 198 patients are active