श्री गणेशा न झालेली जुनी कामे रद्द करण्याचा ठराव, सभा होणारऑनलाईन

सुगत खाडे  
Friday, 2 October 2020

 अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत काही दलित वस्त्यांमध्ये जुनी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे सदर कामे रद्द करण्याचा ठराव जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या ऑनलाईन पार पडलेल्या सभेत मंजुर करण्यात आला.

अकोला :  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत काही दलित वस्त्यांमध्ये जुनी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे सदर कामे रद्द करण्याचा ठराव जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या ऑनलाईन पार पडलेल्या सभेत मंजुर करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची गुरूवारी (ता. १) ऑनलाईन सभा पार पडली. सभेत दलित वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत काही जुनी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे सदर कामे रद्द करण्याचा ठराव जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या ऑनलाईन पार पडलेल्या सभेत मंजुर करण्यात आला. त्यासह दलित वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त प्रस्तावानुसार कामांच्या स्वरुपाचे आणि कामांचे वस्तीचे बदलास सभेत मंजुरी देण्यात आली.

त्याअंतर्गत तेल्हारा तालुक्यातील चार वस्त्यांच्या कामांमध्ये बदल करण्यात आले. सन् २०१८-१९ ते २०२२-२३ पर्यंतच्या बृहत आराखड्यात जी कामे समाविष्ट असून सुद्धा तेथील वस्ती समाविष्ट झाले नाहीत व काही ग्रा.पं. समाविष्ट झाले नाहीत, अशा वस्त्यांचे व ग्रा.पं.चे प्रस्ताव मागविण्याचा ठराव सभेत मंजुर करण्यात आला.

ऑनलाईन पार पडलेल्या सभेला सभापती आकाश सिरसाट, जि.प. सदस्य गजानन डाफे, प्रशांत अढाऊ, कोमल पेटे, माया नाईक, निता गवई, आम्रपाली खंडारे, प्रकाश वाहूरवाघ, दीपमाला दामधर व सभेचे सचिव तथा समाज कल्याण अधिकारी आर.एस. वसतकर यांची उपस्थिती होती.

मंडप व लाऊड स्पीकर योजनेसाठी अर्ज आमंत्रित
समाज कल्याण विभागामार्फत या आर्थिक वर्षात १०० टक्के अनुदानावर मागासवर्गीय लाभार्थ्यांना मंडप व लाऊड स्पीकर पुरविण्याची योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांकडून ६ ऑक्टोबरपर्यंत पंचायत समिती स्तरावरून अर्ज मागविण्यास समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Resolution to cancel old works which have not started, meeting will be held online