
येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ ( एस.टी.) सेवानिवृत्त कर्मचारी बी.यू.इंगळे यांनी ता.१४ डिसेंबरपासून विभाग नियंत्रण कार्यालयासमोर समोर रास्त मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. ते अकोला विभाग नियंत्रण कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते.
मूर्तिजापूर (जि.अकोला) ः येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ ( एस.टी.) सेवानिवृत्त कर्मचारी बी.यू.इंगळे यांनी ता.१४ डिसेंबरपासून विभाग नियंत्रण कार्यालयासमोर समोर रास्त मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. ते अकोला विभाग नियंत्रण कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते.
ता.३० एप्रील रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पेंशनसाठी लागणारी सर्व कागदपत्रे विभाग नियंत्रण अकोला कार्यालयातील प्रशासन लिपिक शेख अमीन यांच्या कडे दिली. त्यांनी संपूर्ण कागदपत्रांची शहानिशा देखील केली.
पेंशनची कागदपत्रे पेंशन विभागात का पाठविण्यात आली नाहीत, अशी विचारणा इंगळे यांनी केली असता प्रशासकीय अधिकारी शंभरकर यांनी सध्या लिपीक नसल्याने पाठविता येणार नाही असे कारण समोर ठेवले.
सतत उडवाउडवीची उत्तरे देतात. विभाग नियंत्रण कार्यालयात चकरा मारून त्रस्त झाले आहे. पेंशनची रक्कम मिळण्यासाठी विनाकारण त्रास दिल्या जात आहे.
म्हणून शेवटी त्रस्त होवून ता.१४ डिंसेबरपासून विभाग नियंत्रण कार्यालय ( एस.टी.) विभाग अकोला कार्यालयासमोर कुटुंबासह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा इंगळे यांनी विभाग नियंत्रण कार्यालयास एक पत्र देवून केला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)