कुरीअरने मिळते पिस्तूल व जिवंत काडतूस, बसस्थानकावर आलेल्या शस्त्रांचे मुंबई कनेक्शन

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 24 November 2020

बस स्थानकावर २१ रोजी कुरिअरने आलेल्या शस्त्रास्त्र पार्सलसह अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या सखोल चौकशी नंतर अधिक चौकशीसाठी दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले

साखरखेर्डा (जि.बुलडाणा) :  बस स्थानकावर २१ रोजी कुरिअरने आलेल्या शस्त्रास्त्र पार्सलसह अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या सखोल चौकशी नंतर अधिक चौकशीसाठी दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले असून त्याचेवर मुंबईत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

येथील बसस्थानकावर कुरिअर द्वारे सहज शस्त्रास्त्र सहज उपलब्ध होत असल्याने पोलिस विभागात मात्र खळबळ उडाली आहे .

हेही वाचा - प्रयोग फसला; 94 टक्के विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी ‘नो एन्ट्री’

जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली असून याचे धागेदोरे शोधल्या जातील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उपरोक्त प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक करणार असून सदर संशयित व्यक्ती विरुद्ध मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पथकाने दिली आहे .

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

साखरखेर्डा बसस्थानकावर २१ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजेपासून ए टी एस पथक आणि स्थानिक पोलिस कुरिअर सर्व्हिस वाल्यावर लक्ष ठेवून होते. गेल्या १२ तारखे पासून शस्त्रास्त्र असलेले पार्सल साखरखेर्डासाठी रवाना झाले होते .

नेमके ते पार्सल कुणाचे आणि तो घेणारा व्यक्ती कोन? याची साखरखेर्डा पोलिसांनी आणि एटीएस पथकाने कमालीची गुप्तता बाळगली होती. साखरखेर्डा गावात सहज कुरिअर द्वारे असली शस्त्र उपलब्ध होत असतील तर याचा खुपमोठा धोका समाजाला होऊ शकतो .

हेही वाचा - VIDEO: प्रेरणादायी: भिंती बोलू लागल्या! आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी कहाणी

या अनुषंगाने साखरखेर्डा पोलिसांनी दखल घेतली आहे. ए टी एस पथक त्यांच्या पद्धतीने तपास करीत असली तरी त्यांना वेळोवेळी सहकार्य करण्याची जबाबदारी आमची आहे ,असे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी पत्रकारांना २२ नोव्हेंबरला सांगितले.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

काल रात्री ३ पर्यंत चौकशी करून आणखी सखोल चौकशी साठी त्याला एटीएसने ताब्यात घेऊन पुढील कारवाई मुंबई येथे होणार असल्याचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी सांगितले. येथील पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, अधिक तपासात याचे धागेदोरे शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून पोलिस सतर्क होऊन जिपोअधिक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Sakharkheda pistol and live cartridge case, accuseds investigation to Mumbai